संकटं पाठुंगळीला घेऊन ऋषी सुनाक प्रधान मंत्री झालेत.
ऋषी सुनाक नावाचा एक बिगर ख्रिस्ती, बिगर ब्रिटीश माणूस युकेचा प्रधान मंत्री झालाय. युकेच्या इतिहासात उद्भवलेल्या अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांना देशाचं प्रमुखपद मिळालंय. युकेची आर्थिक परिस्थिती खूपच वाईट आहे. एका परीनं ती परिस्थिती प्रातिनिधीक आहे, जगभरचे बहुतेक देश आर्थिक संकटात आहेत. महागाईमुळं देशोदेशीच्या जनतेला जगणं मुश्कील झालंय. महागाईपाठोपाठ मंदी येतेय. मंदीबरोबरच बेकारी येतेय. बेकारीबरोबरच विषमता येतेय. साऱ्या जगाला या संकटाला तोंड देणं जड जातंय. त्यामुळंच ऋषी सुनाक संकटाला कसं तोंड देताहेत ते जग पहाणार आहे. युकेमधली संकट मालिका बोरीस जॉन्सन २०१९ साली भरघोस…