पृष्ठभागाच्या खाली काही तरी घडतय.
जनतेच्या मनात काय दडलंय? भाग ३. राजकीय प्रभाव, परिणाम? धुप्पा, हिप्परगा (माळ), रामतीर्थ, पार्डी, डोंगरकडा नायगाव, या गावातल्या लोकांशी बोललो. विविध ठिकाणी. त्यासाठी फार चहा प्यावा लागला. दुधाच्या चहाचा वीट आल्यावर बहुतेकांनी छोट्या ग्लासातून अर्धा ग्लास डिकॉक्शन पाजलं. म्हणजे बिनदुधाचा काळा चहा. लोकांना राहुल गांधीबद्दल कुतुहुल होतं. ‘येवढा मोठा माणूस. टीव्हीवर दिसणारा. वडील, आजी, पणजोबा, पंतप्रधान. असा माणूस रस्त्यावर चालतो, लोकांच्याबरोबर, लोकांमधे मिसळतो. पाहुया तरी हा बाबा कोण आणि कसा आहे. छान वाटलं त्याला पहाताना भेटताना’ राहुलबद्दल लोकांना प्रेम आपुलकी निर्माण झाली…