Browsed by
Month: December 2022

सिनेमा: हॉलिवूडचा इतिहास सांगतो ‘बॅबिलॉन’.

सिनेमा: हॉलिवूडचा इतिहास सांगतो ‘बॅबिलॉन’.

मूकपटाचं बोलपट हॉलिवूड वळण. बॅबिलॉन. डेमियन शॅझेल या दिक्दर्शकाचा बॅबिलॉन हा चित्रपट थेटरांत झळकला आहे. झळकताक्षणीच चित्रपटाची चर्चा सुरु झालीय आणि यंदाच्या ऑस्कर स्पर्धेत तो नामांकनं मिळवणार, बक्षिसं मिळवणार अशी भाकितं वर्तवली जात आहेत.एका परीनं ते स्वाभाविक आहे. पाचच वर्षांपूर्वी शॅझेलच्या ला ला लँडनं प्रेक्षकांना आणि ऑस्कर परीक्षकांना वेड लावलं होतं. अनेक बक्षिसांसह शॅझेल ऑस्करचा सर्वोत्तम दिक्दर्शक झाला होता. हॉलिवूड चित्रपट सृष्टीत मूक सिनेमा संपून बोलपट सुरु झाला त्या काळाच्या (विशीचं-तिशीतलं हॉलिवूड)  आठवणी जागवत हा चित्रपट त्या काळात सिनेमा करणाऱ्यांचं  चित्र प्रेक्षकांसमोर…

Read More Read More

एकहाती देश उभारणारा नेता.

एकहाती देश उभारणारा नेता.

होऊन गेलेल्या मोठ्या नेत्यांची चरित्र वाचणं उदबोधक असतं. नेता काळाच्या पडद्याआड गेल्याला बराच काळ लोटल्यानंतर त्या नेत्यांकडं अंतर ठेवून, तटस्थपणे पहाता येतं. त्यामुळं त्या नेत्याचं योग्य मोजमाप शक्य होतं. नेत्यांनी केलेली कामं काळाच्या ओघात टिकली असतील तर त्या नेत्याबद्दलचा आदर वाढतो.चरित्र वाचतांना एक गोष्ट तर नक्कीच होते. वर्तमान काळ समजायला  चरित्रं मदत करतात. हेन्री किसिंजर यांनी लिहिलेल्या लीडरशिप या पुस्तकात जगातल्या सहा राष्ट्रप्रमुखांचं कर्तृत्व चरित्र रेखाटलं आहे. आपल्या सर्वाना माहित आहे की हेन्री किसिंजर अमेरिकेचे परदेश मंत्री होते, अमेरिकन अध्यक्षांचे सल्लागार…

Read More Read More

फरा आणि काश्मिर फाईल्स

फरा आणि काश्मिर फाईल्स

फरा (Farah) याच शीर्षकाचा चित्रपट , फरा या १४ वर्षाच्या पॅलेस्टिनी मुलीची गोष्ट सांगतो. गोष्ट सरळ रेषेत जाणारी आहे. १९४८ साल आहे. स्थळ आहे पॅलेस्टाईन. बाहेरून आलेल्या ज्यूंनी पॅलेस्टाईन  भूमीचा ताबा घेतलाय. एकेका गावात घुसून ते स्थानिक पॅलेस्टिनी लोकांना ठार करतात, त्यांच्यावर अत्याचार करतात.   त्यांना मारून टाकतात. त्यांना गाव सोडून निघून जायला सांगतात. गावाचा कब्जा घेतात. तिथं इस्रायल नावाचा देश तयार करतात. सात लाख पॅलेस्टिनी या घटनाक्रमात मारले गेले/  विस्थापित झाले. इस्रायलनं पॅलेस्टाईन व्यापणं आणि त्यात झालेली हिंसा या  घटनेचं वर्णन अरबी भाषेत नकबा असं करतात….

Read More Read More

मुंबईची वाट लावणारा विकास

मुंबईची वाट लावणारा विकास

मुंबईची वाट लावणारा विकास मुंबईत, वरळी परिसरात, १६ हजार ५५७ कुटुंब तीन मजली चाळीत रहातात. घरात संडास नसलेल्या एक खोलीच्या या घराचं क्षेत्रफळ १६० चौरस फूट आहे. या वस्तीला बीडीडी चाळी असं म्हणतात. १९२० साली ब्रिटिशांनी या चाळी बांधल्या. चाळी बांधण्यासाठी  बाँबे डेवलेपमेंट डिरेक्टरेट स्थापलं, त्यावरून या चाळींना बीडीडी चाळी असं नाव पडलं. त्या वेळी मुंबई म्हणजे सात बेटं होती. बेटांमधल्या समुद्रात भर घालून जमीन तयार करण्यात आली, तिथं  कामगारांसाठी ही घरं बांधण्यात आली. आजही या इमारतींच्या मूळ भिती मजबूत आहेत, पण…

Read More Read More

हिटलर माझा शेजारी…

हिटलर माझा शेजारी…

गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माय नेबर ॲडॉल्फ हा चित्रपट दाखवण्यात आला. ॲडॉल्फ म्हणजे ॲडॉल्फ हिटलर…. काल परवापर्यंत एक बातमी मधेमधे येत असे. नेताजी सुभाषचंद्र बोस अजून जिवंत आहेत. अमूक ठिकाणी आश्रमात रहातात, तमूक ठिकाणी ते बाजारात दिसले.  एकादा माणूस किंवा एकादी घटना जेव्हां गूढ असते, रहस्य झालेली असते तेव्हां अशा बातम्या उठत रहातात. त्यातूनच कॉन्स्पिरसी सिद्धांत, कारस्थान सिद्धांत जन्मतात. नेताजींचा मृत्यू झालेला नाही, ते योग्य  परिस्थिती निर्माण झाल्यावर प्रकट होतील असं कारस्थान सिद्धांत सांगू लागतो. हिटलरच्या मृत्यूबाबतही असेच सिद्धांत नाझींनी…

Read More Read More