वाSSळवी, वाSSळवी.
वाळवी. वाळवी हा परेश मोकाशी यांचा चौथा चित्रपट. माध्यमांत या चित्रपटावर जोरदार चर्चा चाललीय. चित्रपटाला लेबलं लावली जातायत. कॉमेडी, रहस्यम कॉमेडी, ब्लॅक कॉमेडी. पहाणाऱ्याचा जसा अनुभव, दृष्टी, जगणं, तसं लेबल. सुरवातीला एक काहीसं अशक्त मार्केटिंग झालं.तेही चुकीचं. पोस्टर केलंय ते इतकं बंडल आहे की त्यावरून काही पत्ता लागत नाही. एका कोचावर तिघं बसलेत आणि त्या कोचाचा एक पाय मोडलाय आणि तिघं कोसळत आहेत. किती निर्बुद्ध. मराठी चित्रपट आहे, मराठी माणसानं तो उचलून धरला पाहिजे, आपण मराठी माणसंच मराठीच्या कसे विरोधात…