ऑस्कर २३. देखणा, विचार करायला लावणारा Tár
देखणा, विचार करायला लावणारा ‘टार’. लीडिया टार असं नाव असलेलं एक काल्पनिक व्यक्तिमत्व प्रस्तुत टार या चित्रपटात रंगवलंय. टार नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वात नसली तरी आपण तिला पाहिलंय, भेटलोय असं वाटावं अशी ही टार आहे. टार संगितकार आहे. पश्चिमी संगित विश्वात एक कंडक्टर असतो, तो वाद्यवृंदाकडून नामांकित संगितकारांच्या रचना वाजवून घेतो. बीथोवन, बाख, चायकोवस्की, माहलर इत्यादी. अनेक वाद्यं, अनेक वादक. त्यांच्याकडून रचना वाजवून घेणं हे कौशल्य असतं. कंडक्टरला समाजात प्रतिष्ठा असते. बर्लीन फिलहार्मोनिक ही ऑपेरा-संगितातील एक नंबरची संस्था मानली जाते….