पुस्तक. लेखक-पत्रकार यांच्या मजकुरात सत्य कधीच नसतं.
——- प्रयोगव्यक्ती (subject) आणि लेखक (पत्रकार) यातील नातं असा या पुस्तकाचा विषय आहे. थोडंसं विस्तारानं पाहूया. पत्रकार एकाद्या व्यक्तीला भेटतो, त्याची मुलाखत घेतो, त्यातून एक बातमी करतो, एक लेख लिहितो. ती व्यक्ती ही त्याची प्रयोग व्यक्ती असते. ती व्यक्ती, त्या वक्तीचं म्हणणं पत्रकार समजून घेतो आणि जसं समजलं तसं लिहितो. फिक्शनलेखक ज्या व्यक्ती रंगवतो त्या कागदावरच्या असतात, त्याच्या कल्पनेतल्या असतात. त्या खऱ्याखुऱ्या असायलाच पाहिजेत असं बंधन लेखकावर नसतं. त्या व्यक्ती काल्पनिक असल्या तरी वाचकांच्या अनुभवसमज विश्वात त्या बसायला हव्यात याची…