ओपनहायमरची क्षमा कधी मागणार?
ओपनहायमर चित्रपट जगभर सिनेमाघरात प्रदर्शीत झाला. लक्षावधी लोकांनी तो लगोलग पाहिला. जे रॉबर्ट ओपनहायमर १९०४ साली न्यू यॉर्कमधे सधन घरात जन्मले, ते जन्मानं ज्यू होते. त्यांनी सुरवातीला केमेस्ट्री या विषयाचं शिक्षण हार्वर्डमधे घेतलं. पण तो विषय त्यांचा नव्हताच. केंब्रीज आणि नंतर गॉटिंजनमधे त्यांनी क्वांटम मेकॅनिक्स या फीजिक्सच्या ज्ञानशाखेतलं शिक्षण घेतलं. १९३६ साली ते बर्कले युनिव्हर्सिटीत पदार्थविज्ञान शाखेचे प्रोफेसर झाले. पदार्थविज्ञानातले ऊच्च कोटीचे अभ्यासक आणि प्राध्यापक असा त्यांचा नावलौकिक होता. ओपन हायमर शाळेत गेले, कॉलेजात गेले,पीएचडी झाले, बर्कलेत प्राध्यापक झाले….