ईलॉन मस्क. एक चक्रम माणूस.
इलॉन मस्क यांनी निर्माण केलेली स्टारलिंक ही उपग्रह-इंटरनेट व्यवस्था आता एक चिंतेचा, चर्चेचा विषय झालीय. युक्रेनच्या वापरात असलेली ही व्यवस्था लष्करी उपयोगासाठी वापरण्यासाठी इलॉन मस्क परवानगी नाकारू पहात आहेत. ही व्यवस्था युक्रेननं रशियाच्या तळावर ड्रोनहल्ले करण्यासाठी वापरू नये असं मस्क सांगू पहात आहेत. वैतागलेल्या युक्रेनच्या लष्कर प्रमुखांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा इलॉन मस्कच्या धमकीवर चर्चा सुरू केलीय. इलॉन मस्कची स्पेस एक्स ही कंपनी दर आठवड्याला एकदा तरी रॉकेट उडवते. या रॉकेटला डझनभर उपग्रह (सॅटेलाईट) जोडलेले असतात. एकेक उपग्रह एकाद्या सोफ्याच्या…