सिनेमा. ॲस्टरॉईड सिटी. पूर्णपणे कल्पित तरीही खऱ्या कथानकाचा विक्षिप्त धमाल चित्रपट
कॅन महोत्सवात वेस अँडरसनचा ॲस्टरॉईड सिटी सादर झाला. अँडरसनचा हा बारावा चित्रपट. अँडरसनच्या चित्रपटांचं खूप कौतुक होतं, चर्चा होते, कधी कधी नामांकनंही मिळतात पण ऑस्कर लाभत नाही. यु ट्यूबवर अँडरसनच्या चित्रपटाबद्दल खूप बोललं जातं, तो चित्रपट कसे करतो यावर व्हिडियो असतात. आपण त्याचे चित्रपट चारचार वेळा पाहिलेत असं सांगणारे तरूण ट्यूबवर व्हिडियो टाकतात. अनेकांचं तसं मत असतं. कारण त्याचे चित्रपट सरळ नसतात, सरळ रेषेत सरकणारे नसतात, कळायला कठीण असतात. वरवर विनोदी आणि विक्षिप्त वाटतात, पण त्या विक्षिप्तपणाच्या थराखाली अनेक गंभीर…