रविवारचा लेख. चित्ते कां मेले?
२०२२ साली सप्टेंबर महिन्यात भारतात चित्ते आणले तेव्हां खूप गाजावाजा झाला. काय झालं त्या चित्त्यांचं? पहिली नामिबियन चित्यांची बॅच १७ सप्टेंबर २०२२ रोजी भारतात पोचली. त्यात ८ चित्ते होते. नंतर २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आणखी १२ चित्ते द. आफ्रिकेतून आयात करण्यात आले. एकूण चित्त्यांची संख्या २० झाली. त्यातले ९ चित्ते वारले. एका मादी चित्त्याला ४ पिल्लं झाली. त्या पैकी तीन वारली. एक शिल्लक आहे. त्या पिल्लाची काळजी घेतली जातेय, त्याला छोट्या मुलाला जसं हातावर वाढवतात तसं वाढवलं जात आहे. म्हणजे…