रविवारचा लेख/स्कॉर्सेसे भेजाला चिमटे काढतात
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून या चित्रपटात दिक्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसे अमेरिकेची घडण तपासतात. अमेरिकेचं राजकारण, अमेरिकन पोलिस व्यवस्था, अमेरिकन समाजात रुतलेलं शोषण इत्यादी गोष्टींवर हा चित्रपट भाष्य करतो. किलर्स ऑफ दि फ्लॉवर मून याच नावाच्या डेविड ग्रॅन यांच्या पुस्तकावर चित्रपट आधारलेला आहे. मूळ पुस्तक इनवेस्टिगेटिव रिपोर्टिंग या धाटणीचं आहे. फेयरफॅक्स नावाच्या ओसेज आदिवासी बहुसंख्य असलेल्या गावात खून होत असतात. ओसेजांच्या मागणीवरून या खुनांची चौकशी होते, खटला होतो. चौकशी, खटला यामधून समोर आलेल्या माहितीवर प्रस्तुत पुस्तक आधारलेलं आहे. कागदपत्रांच्या अभ्यासावर लिहिलेलं…