रविवार/ संता बाजार
संता बाजार अमेरिकेतल्या (जगातल्याही कित्येक देशातली) ख्रिस्ती घरातली मुलं २५ डिसेंबरची वाट पहात असतात. त्या दिवशी ती सकाळी उठून कोपऱ्यात ठेवलेल्या ख्रिसमस ट्रीकडं जातात. झाडाला खोके लटकावलेले असतात. खोक्यात वस्तू असतात. मुलं फतकल मारून बसतात. एक खोका उघडतात. आनंदानं चित्कारतात. दुसरा खोका उघडतात. आनंद. मुलाभोवती वस्तूंचा जलाशय तयार होतो. रात्री म्हणे सांता क्लॉज येऊन गेलेला असतो. त्याच्याकडं प्रत्येक मुलाचा इतिहास नोंदलेला असतो. मुलानं गेल्या वर्षभरात किती सत्कृत्यं केली? आईबापांचं ऐकलं? नीट अभ्यास केला? सकाळी तोंड नीट धुतलं? भाज्या, गाजर,…