नेवाल्नी भाग ३. ..आणि नेवाल्नी हुतात्मा झाले.
२०११ सालच्या पुतिन यांच्या निवडणुकीला विरोध केल्यानंतर नेवाल्नी यांना फालतू कारणं दाखवून तुरुंगवास झाला. तिथून काही ना काही कारणं दाखवून अटक करणं, स्थानबद्द करणं, तुरुंगात घालणं सुरू झालं. २०१७ साली नेवाल्नी यांनी पुतिन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरला. सरकारनं नेवाल्नी यांच्यावर खटले भरले आणि त्या खटल्यांच्या आधारे नेवाल्नींचा निवडणूक अर्ज रद्दबातल करण्यात आला. रशियन सरकारकडं एक खासमखास माणसांचं दल आहे. ही माणसं सैन्यातली असतात, त्यांची ओळख पुसून टाकण्यात आलेली असते. त्यांची नावं, पासपोर्ट बदललेले असतात. या लोकांकडं विषाच्या कुप्या असतात….