रविवार/घटनेची गुंडाळी
मी ‘कालनिर्णय’ साठी बॉब सिल्वर्स या संपादकावर लेख लिहीत होतो. न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स या एका जगन्मान्य पाक्षिकाचे सिल्वर्स हे संपादक. ६१ वर्षं ते संपादक होते. अनेको नोबेल विजेते लेखक, शास्त्रज्ञ, विचारवंत इत्यादींनी सिल्वर्ससाठी लेखन केलं. सिल्वर्सनी लेखक तयार केले. लेखनातली क्लिष्टता काढून टाकणं, लेखन प्रवाही ठेवणं, लेखन सोपं ठेवणं, ते अगदी स्पष्ट आणि समजेल असं ठेवणं या सवयी त्यांनी लेखकाना, भल्या भल्या लेखकांना लावल्या. मुख्य म्हणजे लेखन साधार असलं पाहिजे, तपशील असले पाहिजेत, पुरावे असले पाहिजेत असा त्यांचा…