रविवार/ धोरण तडीस लावणं, चिनी पद्धत.
चीन हा जगाच्या कुतुहुलाचा विषय असतो. जगातली दोन नंबरची अर्थव्यवस्था चालते तरी कशी याचा नीटसा पत्ता अजून जगाला लागलेला नाही. चीनमधे सध्या ३.६२ लाख सरकारी उद्योग आहेत. १० वर्षांपूर्वी त्यांची संख्या २.२७ लाख होती. चीनमधे आज १ लाख खाजगी उद्योग आहेत. सरकारी आणि खाजगी उद्योग एकमेकांच्या मदतीनं अर्थव्यवस्था चालवतात. चीनला हे कसं काय जमतं? १५वं ते १९वं शतक अशी चारशे वर्षं चीन जगापासून तुटला होता. चीनच्या सम्राटानं चीनचा जगापासूनचा संबंध तोडला होता.चीनमधे काय चाललंय ते कळत नसे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात…