Browsed by
Month: May 2024

पुस्तकं/ समजायला कठीण पण सॉलिड पुस्तक

पुस्तकं/ समजायला कठीण पण सॉलिड पुस्तक

WHO IS AFRAID OF GENDER लेखक JUDITH BUTLER प्रकाशन ALLEN LANE ।। प्रस्तुत पुस्तक यंदा प्रसिद्ध झालं असून बटलर यांचं ते सर्वात ताजं पुस्तक आहे. बटलर यांचे अनेक संशोधनपर प्रबंध आणि भाषणांच्या पुस्तिका प्रसिद्ध आहेत. पुस्तक या वर्गात बटलरनी केलेलं लिखाण मोजायचं तर प्रस्तुत पुस्तक २५ वं आहे. जुडिथ बटलर वर्तमान काळातले सर्वाधिक वादग्रस्त, प्रक्षोभक विचारवंत आहेत. कॅलिफोर्निया विश्वशाळेत (बर्कले) ते शिकवतात आणि जगभर प्रवास करत असतात. लोकशाही, जेंडर या विषयावर ते जगभर चर्चासत्रं आयोजित करतात, वक्ता म्हणून अनेक संस्था-कार्यशाळांत…

Read More Read More

सिनेमे /मेगॅलोपोलिस

सिनेमे /मेगॅलोपोलिस

मेगॅलोपोलिस फ्रान्सिस कोपोलाचा मेगॅलोपोलिस कॅन्झमधे नुकताच प्रदर्शित झालाय. इसवीपूर्व ६० सालचं कथानक. रोम. सिसेरो (विन्स्टन चर्चील यांचा आवडता हीरो) हा राज्यकर्ता. कॅटालिना हा नेता त्याचं राज्य उलथवून टाकण्याचा कट रचतो. कॅटालिनाचं म्हणणं की सिसेरोचं राज्य लुटारूंचं आहे. कॅटालिनानं सिसेरोचं राज्य उलथवून त्या ठिकाणी गरीबांचं राज्य आणण्याचा प्रयत्न केला.  फ्रान्सिस कोपोला या नामांकित दिक्दर्शकानं वरील कथानक २१ व्या शतकातल्या अमेरिकेत आणून ठेवलंय. न्यू यॉर्क उध्वस्थ झालंय. एक आर्किटेक्ट न्यू यॉर्क एकविसाव्याच्याही पलिकडल्या शतकात शोभेल असं न्यू यॉर्क वसवायचा प्रयत्न करतो. हा…

Read More Read More

रविवार/ मोदी सांगे….

रविवार/ मोदी सांगे….

करण ब्रार (२२), कमलप्रीत सिंग (२२) आणि करणप्रीत सिंग (२८) या तीन तरूणांना कॅनडाच्या पोलिसांनी हरदीप सिंग निज्जर याच्या खुनाच्या आरोपाखाली पकडलं आहे. तिघंही भारतीय नागरीक आहेत, स्टुडंट व्हिसावर गेली तीन ते पाच वर्षं  कॅनडात रहात आहेत. # हरदीप सिंग निज्जर, व्हँकुव्हरमधला एक खालिस्तान समर्थक. कॅनडातल्या पोलिसांनी निज्जरला जून २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सांगितलं होतं की त्याच्या खुनाचा प्रयत्न होणार आहे, त्यानं सावध रहावं. १८ जून २०२३ रोजी व्हँकुव्हरमधल्या गुरुद्वारातून बाहेर पडत असताना निज्जरवर हल्ला झाला. दोन कार आणि सहा…

Read More Read More

सिनेमे. अमेरिकन फिक्शन

सिनेमे. अमेरिकन फिक्शन

अमेरिकन फिक्शन या चित्रपटाला ऑस्करसाठी ६ नामांकनं होती,   साहित्य कृतीवरून तयार केलेली पटकथा या वर्गातलं बक्षीस ऑस्करनं फिक्शनला दिलंय. पर्सीवल एव्हरेटच्या इरेजर या कादंबरीवरून पटकथा तयार करण्यात आलीय. चित्रपटाचा नायक आहे थेलोनियस एलिसन (टोपण नाव मंक). जेफ्रे राईटनं ही भूमिका केलीय. एलिसन प्राध्यापक आहे, लेखक आहे. आफ्रिकन अमेरिकन (काळा) आहे. वैतागलेला आहे. काळ्यांना गोरे अमेरिकन ज्या रीतीनं पहातात ते त्याला मंजूर नाहीये. आपण काळे आहोत म्हणून काळ्यांच्याच दृष्टिकोनातून जगाकडं पाहिलं पाहिजे ही लोकांची धारणा त्याला मंजूर नाहीये. त्यानं पर्शियन…

Read More Read More

रविवार/युक्रेनी जीवाच्या आकांतानं कां लढत आहेत?

रविवार/युक्रेनी जीवाच्या आकांतानं कां लढत आहेत?

खारकीव, रशियाच्या हद्दीपासून १९ मैल. १९ एप्रिलची संध्याकाळ. आसमंतात सायरन वाजत आहेत, बाँब किंवा गोळा पडण्याची शक्यता आहे. नागरीक सुरक्षित जागी रवाना झाले. खारकीवपासून दूरवर कुठं तरी तोफ गोळे पडले. सायरन थंड झाला. नागरीक रस्त्यावर आले, आपापल्या कामाला लागले.  चौकात माणसांचा गट गोळा झाला. त्यात नागरीक आहेत, सैनिक आहेत. इराण आणि इस्रायलमधील तणावांवर चर्चा चाललीय. ‘इराणच्या दूतावासावर इस्रायलनं हल्ला केला. आता इराण इस्रायल युद्ध सुरु होईल. युद्ध सुरु झाल्यावर अमेरिका इस्रायलकडं मदतीचा ओघ सरकवेल. तसं झालं तर आपले वांधे, आपली…

Read More Read More

पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.

पुस्तकं/ पुस्तकं काढणारी मस्त माणसं.

THE BOOK-MAKERS A HISTORY OF BOOKS ADAM SMYTH || प्रस्तुत पुस्तकात पुस्तक व्यवसायातल्या १८ व्यक्तींची शब्दचित्रं आहेत. १४७६ साली लंडनमधे स्थापन झालेल्या छापखान्याच्या निर्मात्यापासून सुरवेत होते, १८८० सालच्या पहिल्या सर्क्युलेटिंग लायब्ररीपर्यंतचे पुस्तक व्यवहार आणि ते घडवून आणणाऱ्या उद्योगी व्यक्ती या पुस्तकात आहेत. आजच्या डिजिटल पुस्तकांपर्यंत लेखक पोचला आहे. पुस्तक या वस्तूचा एक धावता इतिहास या पुस्तकात आहे. लेखक, प्रकाशक, कंपोझर, प्रिंटर, बाईंडर, विक्रेता असे मिळून पुस्तक छापतात. काळाच्या ओघात पुस्तकाचे आकार आणि रुप बदलत गेलं. आता घरातल्या साध्या टेबलावरही पुस्तक…

Read More Read More

रविवार. ट्रंप खटल्याचं नाट्य

रविवार. ट्रंप खटल्याचं नाट्य

न्यू यॉर्कच्या कोर्टात अमेरिकेचे माजी प्रेसिडेंट आणि आजी उमेदवार डोनल्ड ट्रंप यांच्यावर निवडणूक कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून खटला सुरू झालाय. अमेरिकेत ज्यूरी असते. त्यांचा निर्णय निर्णायक ठरत असतो. मतदार यादीतून आणि कार चालवण्याच्या परवाना यादीतून ज्युरर निवडले जातात, रँडम पद्दतीनं. ज्यांची नावं येतील त्यांना न्यायालय बोलावतं, त्यांची चाचपणी करतं आणि खटल्याच्या हिशोबात ते निःपक्षपाती आहेत याची खात्री केली जाते. फिर्यादी आणि बचाव या दोन्ही पक्षाचे वकील या यादीची कसून तपासणी करतात, ज्युरर पक्षपाती असू नयेत अशी अपेक्षा असते.  एक संभाव्य…

Read More Read More

सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.

सिनेमे: परफेक्ट डेज, एक जपानी प्रयोग.

परफेक्ट डेज.  जपानी फिल्म. कॅन महोत्सवात दोन पारितोषिकं आणि २०२४ च्या ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठी नामांकन.  चित्रपटाचा विषय आहे टोकियोतल्या हिरायामा या  टॉयलेट साफ करणाऱ्या माणसाचं जगणं. बिनलग्नाचा. बहुदा चांगल्या घरातला. बहुदा हेतूपूर्वक हे काम स्विकारलेलं. त्याची बहीण सुस्थितीत आहे. तिला आपल्या भावानं असलं कमी प्रतीचं काम करणं पसंत नाही. हिरायामाला त्याची तमा नाही. तो मनापासून हे काम करतो. दिवसभर काम करतो, रात्री झोपण्यापूर्वी दर्जेदार साहित्य (विल्यम फॉकनर, आया कोडा, पॅट्रिशिया हायस्मिथ ) वाचतो. फोटोग्राफीचा नाद आहे. फोटो काढतो, प्रिंट…

Read More Read More