रविवार. ट्रंपांवर गोळीबार, आश्चर्य वाटायला नको
अमेरिका म्हणजे एक गंमतच आहे. अमेरिकेची लोकसंख्या आहे ३३ कोटी आणि अमेरिकेत नागरिकांकडं ३९ कोटी बंदुका आहेत. अमेरिकेचे चार प्रेसिडेंट प्रेसिडेंट असतानाच बंदुकीच्या गोळीला बळी पडून मेले आणि तीन प्रेसिडेंटवर गोळीबार झाला पण वाचले. डोनल्ड ट्रंप हे गोळीबारात वाचलेले चौथे प्रेसिडेंट. गेल्या वर्षी दी मंक अँड दी गन नावाचा एक चित्रपट मुंबईतल्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. भूतान या शांत देशाचा राजा ठरवतो की राजेशाही बरखास्त करून लोकशाही आणायची. राजाच राजेशाही रद्द करतो. लोकशाहीची सवय नसलेल्या लोकांना लोकशाहीचं प्रशिक्षण द्यायचं…