पुस्तकं.
अमेरिका शंभर वर्षं मागे गेलीय. २१ जानेवारी १९२५ रोजी अमेरिकेतल्या टेनेसी राज्यातल्या विधानसभेमधे जॉन बटलर या आमदारानं एक विधेयक मांडलं. फक्त २०० शब्दांच्या विधेयकात म्हटलं होतं की राज्यातल्या शाळेमधे विज्ञान हा विषय शिकवताना बायबलमधे मांडलेला विश्व निर्मितीचा सिद्धांत सोडता इतर कोणताही सिद्धांत शिकवला जाऊ नये. एका खालच्या श्रेणीतल्या प्राण्यापासून माणसाची निर्मिती झाली हा सिद्धांत शिकवणं बेकायदेशीर आहे. थोडक्यात असं की डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत हा ख्रिस्ती विचारापेक्षा वेगळा असल्यानं तो शिकवू नये. २१ मार्च १९२५ रोजी विधेयक मंजूर होऊन बटलर कायदा…