संपादकीय स्वातंत्र्य
वर्तमानपत्रांची नीतीमत्ता हा विषय अमेरिकेत धसाला लागतोय . लॉस एंजेलिस टाईम्स या पेपरच्या संपादकीय विभागाच्या प्रमुख मेरियल गार्झा यांनी पेपरच्या मालकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. लॉस एंजेलिस टाईम्स हा कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा पेपर आहे. मेरियल गार्झानी लिहिलंय ‘कमला हॅरिस यांना पाठिंबा देण्याचं संपादकीय विभागानं ठरवलं होतं, तसं संपादकीय मी लिहिलं होतं. आमच्या मालकांनी ते प्रसिद्ध करायला नकार दिला. त्यामुळं मी संपादकीय विभागाचा राजीनामा देत आहे.आमच्या पेपरनं बातमीदारीच्या निःपक्षपाती परंपरेनुसार, निवडणुकीबद्दलच्या बातम्या, दिल्या. पेपरच्या परंपरेनुसार आमचा संपादकीय विभाग स्वतंत्र…