Browsed by
Month: November 2024

एआयची घातकता

एआयची घातकता

रात्री आठची वेळ होती. एक तरूण विंडसर किल्ल्याच्या भिंतीवर चढण्याच्या बेतात होता. तोंडावर मास्क होता, हातात एक धनुष्य बाण होता. तरुणाचं नाव होतं जसवंत चैल. पहारेकऱ्यानं पकडलं. २०२१ साली धनुष्यबाण घेणारा माणूस भिंतीवर कां बरं चढत असेल? पहारेकऱ्याला प्रश्न पडला. ‘मला राणीला मारायचंय!’ पोलिस बुचकळ्यात पडला. थप्पड मारून घालवून द्यावं असंच पहारेकऱ्याला वाटलं असणार. पण अटक करणं भाग होतं. जसवंत चैलचा खरंच राणीला मारायचा बेत होता. पोलिसांनी जबाब घेतला तेव्हां पहिल्या झटक्यातच जसवंतनं सांगून टाकलं. जसवंत चैलचा ब्रिटीशांवर राग होता….

Read More Read More

झाऊ एनलाय यांचं ताजं चरित्र ⚛️ पुस्तक      Zhou Enlai : A Life लेखक       Chen Jian प्रकाशक    Harvard ⚛️ झू एनलाय (पूर्वी चाऊ एन लाय म्हणत) यांचं एक नवं चरित्र प्रकाशित झालं आहे. झू (१८९८-१९७६) माओ झेडाँग (पूर्वी माओ त्से तुंग म्हणत) यांचे सहकारी होते, चीनचे पंतप्रधान आणि परदेश मंत्री होते. चीनमधलं सिविल वॉर, स्वातंत्र्य लढा, कम्युनिष्ट पक्षाची स्थापना आणि चळवळ, माओ झेडाँग यांची राजवट या सर्व घटनाचक्रामधे झू सक्रीय होते. तो सर्व काळ लेखकानं…

Read More Read More

आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…

आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…

डोनल्ड ट्रंप एकदा अध्यक्ष झाले. दुसऱ्यांना हरले. जो प्रेसिडेंट दुसऱ्या टर्ममधे निवडून येत नाही त्याचा उल्लेख अमेरिकन लोक वन टर्म प्रेसिडेंट असा हेटाळणीच्या सुरात करतात. पुन्हा ट्रंपनी निवडणुक लढवली, निवडून आले.  अमेरिकेच्या इतिहासात असं घडलेलं नाही.  पहिल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या ३७ गुन्ह्यांबद्दल ट्रंपना शिक्षा झाली. प्रेसिडेंट  गुन्हेगार सिद्ध होण्याची ही पहिली वेळ होती. ट्रंपचं म्हणणं की खटला राजकीय होता, आपण निर्दोष आहोत. २०२० च्या निवडणुकीत झालेला पराभव ट्रंपनी मान्य केला नाही. बायडनना अधिकृत अध्यक्ष म्हणून मान्य करण्याचा औपचारीक विधी…

Read More Read More

ट्रंप यांच्यावरचा ताजा चरित्रपट

ट्रंप यांच्यावरचा ताजा चरित्रपट

  त्यांची आपली पत्नी इव्हाना हिच्यावर डोनल्ड ट्रंप बलात्कार करताना दिसतात.  डोनल्ड ट्रंप त्यांची पाटलोण खाली करून उभे असतात आणि एक स्त्री त्यांना ‘ब्लो जॉब’ देत असते. डोनल्ड ट्रंप स्त्रीशी संभोग करताना दिसतात. हे सारं डीप फेक किंवा फेक क्लिप नाहीये. ही क्लिप कोणा माणसानं एआयचा वापर करून तयार केलेली नाहीये. ही दृश्यं अली अब्बासी यांनी केलेल्या ‘दी ॲप्रेंटिस’ या चित्रपटातली आहेत. ट्रंप आणि हॅरिस यांच्यात निवडणूक स्पर्धा चालली असताना, हॅरिस आणि ट्रंप यांच्यातली एक वादचर्चा संपली असताना हा चित्रपट…

Read More Read More

सिनेमा. कंट्रोल.

सिनेमा. कंट्रोल.

कंट्रोल. नेटफ्लिक्स. दिल चाहता है (२००१) हा सिनेमा काळाच्या नव्या पोषाखात आला होता. त्यातली तरूण मुलं काळाची भाषा बोलत होती. सैगल, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, वगैरेंचा काळ मागं टाकून सैफ  अली खान इत्यादी पोरं सिनेमात आली. आपल्या पेक्षा किती तरी मोठ्या स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरूण तिथं दिसला.प्रेमाची व्याख्याच चित्रपटात बदलली.धम्माल करणारी मुलं तिथं दिसली. वाढदिवसाचे किंवा अन्य नाच करून आनंद व्यक्त  करण्याच्या पद्धतीला दिल चाहता हैनं फाटा दिला. त्यानंतर वेक अप सिड (२००९) आला. त्यात श्रीमंत घरातला खुशालचेंडू मुलगा दिसला….

Read More Read More