झपाटलेली आणि निर्मनुष्य घरं
अमेरिकेतली ओस आणि झपाटलेली घरं घर विकणं ही एक कला आहे, ते एक कसब आहे. पहिल्या दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट असतो. रस्त्यावरचा गजबजाट, कार आणि ट्रकचे आवाज त्रास देतात. एजंट सांगतो ‘अहो तुम्ही पटकन जिने उतरून जाऊ शकता. विसाव्या मजल्यावरच्या माणसाला समजा काही प्रॉब्लेम आले तर तो काय करेल? तुम्ही पटकन उतरून जाऊ शकता. मनात आलं की पटकन घराबाहेर पडू शकता….तुम्ही भाग्यवान आहात, तुमचे पाय जमिनीवर असतील. या फ्लॅटला फार मागणी आहे. बँकेकडून कर्ज मिळालं नाही म्हणून बहुतेक गिऱ्हाईकं हा…