अमेरिकेतली रस्त्यावर जगणारी माणसं
अमेरिका आयडाहोमधून निघून ओरेगन मार्गे लास व्हेगासला जाताना वाटेत नेव्हाडाचं वाळवंट लागतं. हॉलीवूडच्या चित्रपटात हे वाळवंट एकेकाळी खूप दिसायचं. झुडुपांचा समुद्र पसरलेला. कित्येक मैल दोन्ही बाजूला एकही घर दिसत नाही. पर्वत दिसतात खूप दूरवर क्षितिजाला बिलगून. वाटेत पेट्रोल पंप नसतो, तहान लागली तर प्यायला पाणी मिळत नाही. इंटरनेटचं कनेक्शन नसल्यानं जीपीएस चालत नाही. वाटसरू किंवा कारप्रवासी भीषण एकांतात सापडतो. टाकीत पुरेसं पेट्रोल भरलेलं नसलं आणि टाकी रिकामी झाली तर मरणच. जाणाऱ्या येणाऱ्यानं दया दाखवली तरच सुटका होणार. अशा एकांतात…