अमेरिकन वाटेवर कॅनडा, देशीवादाची लाट
कॅनडातलं वातावरण वेगानं बदललय. लोकांना उदारमती (लिबरल) राजकारण नकोय. त्यांना देशीवादाची भुरळ पडलीय.जगभर उमटलेल्या उजव्या लाटेत कॅनडा सापडला आहे. ❖ कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आपली कारकीर्द पूर्ण होण्याच्या आधीच आपल्या पदाचा राजिनामा देऊन मोकळे झाले. निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आपण पक्षप्रमुख आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राहिलो तर निवडणुकीत पराभव होईल याची खात्री त्यांना पटली. त्यांनी राजीनामा देताना पक्षानं दुसरा पंतप्रधान निवडावा असं म्हटलं आहे. त्यांच्या जागी त्यांचा लिबरल पक्ष नवा नेता निवडेल आणि तो माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊन पुढील निवडणुकीला…