Browsed by
Author: niludamle

एआयची घातकता

एआयची घातकता

रात्री आठची वेळ होती. एक तरूण विंडसर किल्ल्याच्या भिंतीवर चढण्याच्या बेतात होता. तोंडावर मास्क होता, हातात एक धनुष्य बाण होता. तरुणाचं नाव होतं जसवंत चैल. पहारेकऱ्यानं पकडलं. २०२१ साली धनुष्यबाण घेणारा माणूस भिंतीवर कां बरं चढत असेल? पहारेकऱ्याला प्रश्न पडला. ‘मला राणीला मारायचंय!’ पोलिस बुचकळ्यात पडला. थप्पड मारून घालवून द्यावं असंच पहारेकऱ्याला वाटलं असणार. पण अटक करणं भाग होतं. जसवंत चैलचा खरंच राणीला मारायचा बेत होता. पोलिसांनी जबाब घेतला तेव्हां पहिल्या झटक्यातच जसवंतनं सांगून टाकलं. जसवंत चैलचा ब्रिटीशांवर राग होता….

Read More Read More

झाऊ एनलाय यांचं ताजं चरित्र ⚛️ पुस्तक      Zhou Enlai : A Life लेखक       Chen Jian प्रकाशक    Harvard ⚛️ झू एनलाय (पूर्वी चाऊ एन लाय म्हणत) यांचं एक नवं चरित्र प्रकाशित झालं आहे. झू (१८९८-१९७६) माओ झेडाँग (पूर्वी माओ त्से तुंग म्हणत) यांचे सहकारी होते, चीनचे पंतप्रधान आणि परदेश मंत्री होते. चीनमधलं सिविल वॉर, स्वातंत्र्य लढा, कम्युनिष्ट पक्षाची स्थापना आणि चळवळ, माओ झेडाँग यांची राजवट या सर्व घटनाचक्रामधे झू सक्रीय होते. तो सर्व काळ लेखकानं…

Read More Read More

आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…

आधीच माकड, त्यात मद्य प्यालं…

डोनल्ड ट्रंप एकदा अध्यक्ष झाले. दुसऱ्यांना हरले. जो प्रेसिडेंट दुसऱ्या टर्ममधे निवडून येत नाही त्याचा उल्लेख अमेरिकन लोक वन टर्म प्रेसिडेंट असा हेटाळणीच्या सुरात करतात. पुन्हा ट्रंपनी निवडणुक लढवली, निवडून आले.  अमेरिकेच्या इतिहासात असं घडलेलं नाही.  पहिल्या निवडणुकीच्या काळात त्यांनी केलेल्या ३७ गुन्ह्यांबद्दल ट्रंपना शिक्षा झाली. प्रेसिडेंट  गुन्हेगार सिद्ध होण्याची ही पहिली वेळ होती. ट्रंपचं म्हणणं की खटला राजकीय होता, आपण निर्दोष आहोत. २०२० च्या निवडणुकीत झालेला पराभव ट्रंपनी मान्य केला नाही. बायडनना अधिकृत अध्यक्ष म्हणून मान्य करण्याचा औपचारीक विधी…

Read More Read More

ट्रंप यांच्यावरचा ताजा चरित्रपट

ट्रंप यांच्यावरचा ताजा चरित्रपट

  त्यांची आपली पत्नी इव्हाना हिच्यावर डोनल्ड ट्रंप बलात्कार करताना दिसतात.  डोनल्ड ट्रंप त्यांची पाटलोण खाली करून उभे असतात आणि एक स्त्री त्यांना ‘ब्लो जॉब’ देत असते. डोनल्ड ट्रंप स्त्रीशी संभोग करताना दिसतात. हे सारं डीप फेक किंवा फेक क्लिप नाहीये. ही क्लिप कोणा माणसानं एआयचा वापर करून तयार केलेली नाहीये. ही दृश्यं अली अब्बासी यांनी केलेल्या ‘दी ॲप्रेंटिस’ या चित्रपटातली आहेत. ट्रंप आणि हॅरिस यांच्यात निवडणूक स्पर्धा चालली असताना, हॅरिस आणि ट्रंप यांच्यातली एक वादचर्चा संपली असताना हा चित्रपट…

Read More Read More

सिनेमा. कंट्रोल.

सिनेमा. कंट्रोल.

कंट्रोल. नेटफ्लिक्स. दिल चाहता है (२००१) हा सिनेमा काळाच्या नव्या पोषाखात आला होता. त्यातली तरूण मुलं काळाची भाषा बोलत होती. सैगल, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, वगैरेंचा काळ मागं टाकून सैफ  अली खान इत्यादी पोरं सिनेमात आली. आपल्या पेक्षा किती तरी मोठ्या स्त्रीच्या प्रेमात पडलेला तरूण तिथं दिसला.प्रेमाची व्याख्याच चित्रपटात बदलली.धम्माल करणारी मुलं तिथं दिसली. वाढदिवसाचे किंवा अन्य नाच करून आनंद व्यक्त  करण्याच्या पद्धतीला दिल चाहता हैनं फाटा दिला. त्यानंतर वेक अप सिड (२००९) आला. त्यात श्रीमंत घरातला खुशालचेंडू मुलगा दिसला….

Read More Read More

संपादकीय स्वातंत्र्य

संपादकीय स्वातंत्र्य

वर्तमानपत्रांची नीतीमत्ता हा विषय अमेरिकेत धसाला लागतोय .  लॉस एंजेलिस टाईम्स या पेपरच्या संपादकीय विभागाच्या प्रमुख मेरियल गार्झा यांनी पेपरच्या मालकांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. लॉस एंजेलिस टाईम्स हा कॅलिफोर्नियातला सर्वात मोठा पेपर आहे. मेरियल गार्झानी लिहिलंय ‘कमला हॅरिस यांना पाठिंबा देण्याचं संपादकीय विभागानं ठरवलं होतं, तसं संपादकीय मी लिहिलं होतं. आमच्या मालकांनी ते प्रसिद्ध करायला नकार दिला. त्यामुळं मी संपादकीय विभागाचा राजीनामा देत आहे.आमच्या पेपरनं बातमीदारीच्या निःपक्षपाती परंपरेनुसार, निवडणुकीबद्दलच्या बातम्या, दिल्या. पेपरच्या परंपरेनुसार आमचा संपादकीय विभाग स्वतंत्र…

Read More Read More

सरकारला दूर ठेवून समाजहित

सरकारला दूर ठेवून समाजहित

टॅक्स जस्टिस नेटवर्क नावाची एक संस्था आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी, ब्रीटन, फ्रान्स इत्यादी अनेक युरोपियन देशात ही संस्था काम करते. देशातल्या करव्यवस्था;  कर चुकण्याच्या तरतुदी; किती माणसं  किती कर कसा चुकवतात; कर व्यवस्थेत करचोरी थांबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तरतुदी; समाजाचं कर उत्पन्न वाढण्याला पोषक कर व्यवस्था; या विषयांचा अभ्यास ही संस्था करते. वेळोवेळी केलेले अभ्यास ही संस्था जनतेसमोर ठेवते, सरकारकडं पोचती करते, विधीमंडळ सदस्यांना पुरवते. खाज असणारी माणसं या संस्थेत काम करतात. प्रत्येकाची बुडाची खाज हेच या संस्थेजवळचं भांडवल. सरकार आणि धनाढ्य…

Read More Read More

सद्दाम

सद्दाम

सद्दाम हुसैन, इराक आणि अमेरिका. ❖ पुस्तक    The Achilles Trap: Saddam Hussein, the United States and the Middle East  लेखक     Steve Coll. प्रकाशक  Allen Lane ❖ सद्दाम हुसैन म्हटल्यावर त्याची शारीरिक छबी डोळ्यासमोर येईलच असं नाही, पण त्यांचं शब्दचित्र पटकन डोळ्यासमोर येतं. एक हुकूमशहा. एक क्रूरकर्मा. वयाच्या विसाव्या वर्षी सद्दाम हुसैनचा बाथ या राजकीय पक्षात प्रवेश झाला तोच मुळी एक असॅसिन, खुनी, म्हणून. पुढं इराकचा प्रेसिडेंट होण्यापर्यंतच्या वाटचालीत त्यानं किती माणसं मारली असतील ते मोजणंही कठीण. असा हा…

Read More Read More

डळमळीत लोकशाही- तांझानिया

डळमळीत लोकशाही- तांझानिया

तांझानियातली डळमळीत लोकशाही तांझानियाच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. उद्याच्या डिसेंबरमधे स्थानिक संस्थांच्या निवडणुका होतील आणि पुढल्या वर्षी ऑक्टोबरमधे लोकसभेच्या निवडणुका होतील. तांझानियाच्या दारे सलाम या राजधानीच्या गावातली नुकतीच घडलेला घटना. तांझानियाच्या चाडेमा या विरोधी पक्षाचे सेक्रेटरी अली महंमद किबाव घरी परतत असताना बसमधून त्यांना काही लोकांनी उतरवलं. त्यांचे हात बांधले. घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत सापडलं. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या, त्याच्या चेहऱ्यावर ॲसिडच्या खुणा होत्या. गेले काही दिवस विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अपहरणाच्या घटना घडत आहेत. तांझानियाला हडेलहप्पी आणि…

Read More Read More

ट्रंप आणि हिंसाचार

ट्रंप आणि हिंसाचार

ट्रंप आणि हिंसाचार ट्रंप म्हणजे हिंसेला आमंत्रण १० सप्टेंबर २०२४ रोजी ट्रंप-हॅरिस यांच्यात टीव्हीचर्चा झाली. ट्रंप यांच्या वक्तव्यात चिथावणी होती, हिंसाचाराची मुळं होती.    🔪 १५ सप्टेंबर २०२४. डोनल्ड ट्रंप त्यांच्या फ्लोरिडातल्या गोल्फ क्लबवर  गोल्फ खेळत होते.   गोल्फ कोर्सच्या परिघावर असलेल्या झाडांच्या रांगेत रायन राऊथ नावाचा ५८ वर्षाचा एक माणूस लपला होता. त्याच्या हातात एसकेएस पद्धतीची सेमी ऑटोमॅटिक बंदूक होती, बंदुकीवर टेलेस्कोप होता, गोप्रो हा कॅमेरा होता. त्यातून तो ट्रंपवर लक्ष ठेवून होता. ट्रंप ३०० ते ५०० मीटर येवढ्या…

Read More Read More