कॅनडा-भारत- शिख. काय लोचा झालाय?
१८ जून २०२३. कॅनडाचे नागरीक हरदीप सिंग निज्जर (४७) व्हँकुव्हरमधल्या गुरुद्वारातून बाहेर पडले. ते या गुरुद्वाराचे प्रेसिडेंट होते. खालिस्तानचे समर्थक होते. या गुरुद्वारात खालिस्तान समर्थकांची मोठी संख्या आहे. कॅनडाच्या पोलिसांनी निज्जरना त्यांचा खून करण्याचा प्रयत्न होणार आहे असं सांगितलं होतं, सुरक्षेची व्यवस्था ठेवा असं सांगितलं होतं. निज्जरनी दुर्लक्ष केलं होतं. गुरुद्वाराच्या कंपाऊंडमधे त्यांची कार होती. निज्जरनी कारमधे बसून आपल्या मुलाला फोन करून सांगितलं की आपण लवकरच घरी पोचतोय. सीटमधे स्थिर होत होते. कंपाऊंडमधे उभी असलेली एक कार सुरु झाली…