सिनेमा. एक माणूस इतिहास घडवतो!
चार्ली विल्सन्स वॉर. चार्ली विल्सन्स वॉर (२००७), नेटफ्लिक्स. रशियाची हेलेकॉप्टरं आणि गनशिप हवेत भिरभिरतात, रॉकेटं फेकतात. धुराचा लोट मागं सोडत अनघड अफगाण घरावर कोसळतात. धुराचे लोट. उध्वस्थ घर, सैरावैरा माणसं. अमेरिकेत चार्ली विल्सन हे काँग्रेसमन क्लबात, जाकुझीत, एका हातात ग्लास, दुसऱ्या हाती एक श्रीमंत महिला.जोआन हरिंग. हरिंग आणि चार्ली यांच्यातली सेक्समैत्री, पडद्यावर दिसते. श्रीमंत महिला सभा बोलावते. सभेत झिया उल हक. श्रीमंत महिला हक यांचं कौतुक करते. झुल्फिकार अली भुत्तो यांना हकनी फाशी दिलेली असते हे साऱ्या जगाला माहित असतं….