अरबी शैली पुढं नेणारा कादंबरीकार
लेबनीज कादंबरीकाराचं निधन ❖ २०२४ च्या सप्टेंबरात इलियास खूरी यांचं निधन झालं. ते लेबॅनीज होते, लेबनॉनमधे त्यांचं वास्तव्य होतं. त्यांचे आईवडील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन होते. त्यांचं सुरवातीचं शिक्षण जॉर्डनमधे झालं आणि नंतरचं शिक्षण पॅरिसमधे झालं. खूरी अरेबिक आणि हिब्रू या दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार होते. ❖ आधुनिक अरेबिक साहित्यामधे इलियास खूरी यांचं नाव कदाचित नगीब महफूझ यांच्या नंतरचं असेल. महफूझ (नोबेल विजेते) प्रामुख्यानं ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून ओळखले जात. खूरी स्वतःच म्हणत की मी इतिहास लिहित नाही, मी माणसांचं जगणं लिहितो. My…