हेन्री किसिंजर.९९ व्या वर्षी लिहिलेलं पुस्तक.
निक्सन एक वादग्रस्त पण दृष्टा पुढारी. साडेपाचशे पानांच्या या पुस्तकात किसिंजर यांनी जर्मनीचे चॅन्सेलर कोनरॉड ॲडेनॉर, फ्रान्सचे प्रेसिडेंट चार्ल्स डि गॉल, अमेरिकेचे प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन, इजिप्तचे प्रेसिडेंट अन्वर सादत, सिंगापूरचे पंतप्रधान सी कुआन यू आणि ब्रिटीश पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची राजकीय चरित्र रेखली आहेत. हेन्री किसिंजर हारवर्डमधे इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवत. तिथूनच त्यांचा डेमॉक्रॅट रॉकफेलर यांच्याशी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीत संपर्क झाला. नंतर ते अमेरिकन सरकारला विविध मुद्द्यांवर सल्ला मसलत करू लागले. नंतर ते प्रे.निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते…