अग्नीवीर. चिमूटभर प्रयत्न करून पसाभर काम केल्यासारखं दाखवणं.
महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमुळं अग्निवीर रोजगार योजनेचा विषय मागे पडला आहे. देशाच्या लष्कराच्या तीनही शाखांत मिळून ४७ हजार तरुणाना चार वर्षांसाठी दिल्या जाणाऱ्या रोजगार योजनेची चर्चा संसदेत झाली नव्हती. लष्करातही त्यावर काय विचार झाला ते कळायला मार्ग नाही. अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी या योजनेबद्दल शंका आणि असमाधान व्यक्त केलं होतं. अचानक सरकारनं योजना जाहीर केली आणि वाद सुरु झाल्यावर सैन्य प्रमुख प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन या योजनेची भलामण केली. आजवर कधी अशी घटना घडली नव्हती. या योजनेचा लष्कराला किती फायदा आहे? एका…