पैसा परदेशात गुंतवणारे भारतीय
शील ओसवाल नावाच्या एका भारतीय माणसानं ब्रिटीश व्हर्जिन आयलंड या एका बेटावर बिसकॉन नावाची कंपनी स्थापन केली, पैसे त्या कंपनीत गुंतवले. त्या बेटावर कंपनी नोदवली तर तिथं कर वगैरे नसतात, पैसे कुठून आले याची चौकशी त्या बेटाचं सरकार करत नाही, कंपनी काय व्यवहार करते तेही विचारत नाही. ओसवाल यांनी त्या कंपनीतर्फे इंडोनेशियातल्या जीटीबीओ नावाच्या खाणकंपनीत पैसे गुंतवले. इंडोनेशियन खाण कंपनीनं कच्चा माल विकून आणि खनीज यंत्रं विकून काही करोड डॉलर मिळवले. इंडोनेशिय कंपनी आणि बेटावरची कंपनी याना त्यातून नफा मिळाला,…