चर्च आणि राजसत्ता यातील संघर्ष. सिनेमा,’ सर्वंट्स ‘.
Servants. Ivan Ostrochovsky. Slovakia. 2020. बर्लीन चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम दिक्दर्शक आणि सर्वोत्तम ओरिजिनल स्कोअर अशी दोन पारितोषिकं. || एक कार. रात्रीच्या काळोखात रस्त्यावरून जात असते.काही अंतर गेल्यावर एका पुलाखालच्या बोगद्याच्या तोंडाशी थांबते. दोघं जण खाली उतरतात. गाडीची डिकी उघडून पोतं वाटावं अशी वस्तू उचलून रस्त्यावर ठेवतात. त्यातला एक माणूस किती दिसतो? फक्त कंबरेबर्यंत, कोट, लटकणारा स्टेथोस्कोप आणि खाली बूट. दृश्य संपतं. पुढलं दृश्य. घरात माणूस वॉश बेसिनमधे बूटावरचा चिखल धुताना दिसतो. अरे हे बूट तर आधीच्या दृश्यातल्या माणसाचे दिसताहेत आणि तिथं रस्त्यावर…