Browsed by
Author: niludamle

ऑस्कर. मँक. पटकथा लिहिणाऱ्याची पटकथा.

ऑस्कर. मँक. पटकथा लिहिणाऱ्याची पटकथा.

मँक. मँक ही एका पटकथा लिहिणाऱ्या Mankiewicz ची गोष्ट आहे. सिटिझन केन या  बायोपिक चित्रपटाची पटकथा त्यानं लिहिली. पण चित्रपटाच्या दिक्दर्शकानं, ऑर्सन वेलेसनं, श्रेय लाटलं.१९४१ साली पटकथेचं ऑस्कर मँक आणि वेलेसमधे विभागलं गेलं.  हे प्रकरण सिनेवर्तुळात, अमेरिकेत गाजलं. त्यावर वाद झाले, चर्चा झाल्या, लेख आणि पुस्तकं प्रसिद्ध झाली. १९९८ साली जॅक फिंचर यांनी या विषयावर चित्रपट करण्यासाठी पटकथा लिहिली, पण तो चित्रपट  होऊ शकला नाही. जॅक फिंचर यांचा मुलगा डेविड फिंचरनं त्या पटकथेला थोडंसं नवं रूप देऊन मँक हा प्रस्तुत…

Read More Read More

ऑस्कर. साऊंड ऑफ मेटल. ध्वनीकल्लोळ आणि स्तब्ध शांतता.

ऑस्कर. साऊंड ऑफ मेटल. ध्वनीकल्लोळ आणि स्तब्ध शांतता.

साऊंड ऑफ मेटल. साऊंड ऑफ मेटल ही रूबेन आणि लू यांची सांगितीक गोष्ट आहे.   रूबेन आणि लू मेटल या प्रकाराचे संगीतकार. रूबेन ड्रमर आहे आणि लू गिटारिस्ट आहे. दोघं व्हॅनमधेच रहातात, आपली वाद्यं, उपकरणं, घेऊन गावोगाव जलसे करत फिरतात. दोघांची वृत्ती जिप्सी  आहे.   रूबेन अमेरिकन आहे आणि लू फ्रेंच. दोघांनीही अंगावर नाना प्राणी नाना रंगात गोंदवून घेतलेले आहेत. लूच्या बोटांत जाडजूड अंगठ्या आहेत,अंगठ्यामधे खडे आहेत.खडे मौल्यवान वाटत नाहीत, काहीसे ओबडधोबड आहेत. रुबेन ड्रम वाजवत असतो तेव्हां उघडाबंब असतो,…

Read More Read More

ऑस्कर. ‘मिनारी’, आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ.

ऑस्कर. ‘मिनारी’, आजी आणि नातवाचं खट्याळ गूळपीठ.

आजी आणि नातवाचं ‘ मिनारी ‘  हे खट्याळ गूळपीठ चुकवू नका. म्हटलं तर ही गोष्ट एका अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या कोरियन कुटुंबाच्या जगण्याच्या धडपडीची आहे. म्हटलं तर ही गोष्ट छोटा डेविड आणि त्याची आज्जी सून-जा यांच्यातल्या खोडकर गूळपिठीची गोष्ट आहे. कॅलिफोर्नियातल्या एका निर्मनुष्य माळावर जेकब पोचलाय. कोणीही माणूस आसमंतात नाही. जमिनीचा मोकळा तुकडा जंगलझाडांनी घेरलेला आहे. एका ट्रेलर घरात संसार थाटलाय. डॉक्टर म्हणा, एकादी वस्तू म्हणा, काहीही हवं असेल तर काही मैल दूर जावं लागतं. जेकबची बायको मोनिका म्हणते- कुठं निर्जन…

Read More Read More

ऑस्करसाठी. विचारात आणि खुर्चीत खिळवणारा चित्रपट. जूडस अँड ब्लॅक मेसिया.

ऑस्करसाठी. विचारात आणि खुर्चीत खिळवणारा चित्रपट. जूडस अँड ब्लॅक मेसिया.

जूडस अँड ब्लॅक मेसिया. ।। एकाच वर्षी एकाच विषयावर दोन चित्रपट.  दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन या चित्रपटात एक आरोपी आहे बॉबी सील्स. बॉबी सील्सची कोर्टातली उपस्थिती थरारक घटनांनी भरलेली आहे.  बॉबी सील्सच्या मागच्या खुर्चीवर बसून फ्रेड हँप्टन नावाचा तरूण सतत बॉबी सील्सला सल्ला देत असतो.  कोर्ट हँप्टनला झापतं.  खटला  सुरू असतानाच हँप्टनचा खून होतो. जूडस अँड ब्लॅक मेसिया हा चित्रपट फ्रेड हँप्टनच्या खुनावर आहे. हँप्टन, ब्लॅक पँथर या संघटनेच्या शिकागो शाखेचा चेयरमन आहे. शिकागो सेवन खटला कोर्टात चालू असतानाच…

Read More Read More

ऑस्कर २०२१. अमेरिकन तरूणांचं बंड. दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन.

ऑस्कर २०२१. अमेरिकन तरूणांचं बंड. दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन.

दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन. ।।   अमेरिकन सरकारनं दंगलीचा आरोप करून सात तरूणांविरोधात गुदरलेल्या खटल्याची हकीकत दी ट्रायल ऑफ शिकागो सेवन या चित्रपटात  आहे.  चित्रपटात दिसतं ते असं. शिकागोमधे डेमॉक्रॅटिक पक्षाचं अधिवेशन भरणार असतं, तरूण त्या अधिवेशनासमोर निदर्शनं करण्यासाठी गोळा झालेले असतात. अमेरिकन सरकारनं वियेतनाममधे चालवलेल्या लढाईला तरूणांचा विरोध असतो. पोलिस आपले हस्तक या आंदोलनात घुसवतात आणि चिथावणी देऊन दंगल घडवून आणतात. खटल्यात न्यायाधीश त्या सात जणांना दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा देतो.  वियेतनाम युद्धाच्या बातम्यांनी चित्रपट सुरू होतो. तरूणांची…

Read More Read More

ऑस्करसाठी नोमॅडलँड. न दिसणारी अमेरिका.

ऑस्करसाठी नोमॅडलँड. न दिसणारी अमेरिका.

नोमॅडलँड. कलाकार वास्तवापासून दूर राहू शकत नाही. वास्तव कितीही दाहक असो. कवी असो, कादंबरीकार असो,चित्रकार असो की चित्रपट करणारा. कोण काय म्हणेल याचा विचार न करता कलाकार वास्तव चितारतो. वास्तव चितारण्याची पद्धत, व्यक्त होण्याची कलाकाराची पद्धत मात्र वेगळी असते.वास्तव थेट असतं पण त्यावर भाषणं वगैरे कलाकार झोडत नाही. रसिकानं कला अनुभवायची, त्याचा आस्वाद आपापल्या पद्धतीनं घ्यायचा. मांडण्याची मोकळीक कलाकाराला आणि पहाण्याची मोकळीक रसिकाला. संदर्भ आहे नोमॅडलँड या चित्रपटाचा. जेसिका ब्रुडर यांच्या याच नावाच्या एका पुस्तकावर सिनेमा आधारलेला आहे. फर्न ही…

Read More Read More

फादर.

फादर.

‘ फादर ‘  या चित्रपटाला  हा चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनयासाठी नामांकनं मिळाली आहेत. अँथनी हॉपकिन्स यांची फादरमधे प्रमुख भूमिका आहे. ।। स्मृती गमावत चाललेल्या वृद्ध माणसाची गोष्ट ‘ फादर ‘ मधे आहे.  इंजिनियर असलेल्या अँथनीला कधी वाटतं की आपण नृत्यकलाकार होतो तर कधी वाटतं की आपण सर्कसमधे काम करत होतो. आपण नाचणारे कलाकार होतो हे दाखवण्यासाठी फादर अँथनी चक्क टॅप नृत्यही करून दाखवतो. पत्नी आणि एक मुलगी गेली आहे. शिल्लक असलेली, मुलगी,अँन, बापाची काळजी घेतेय.  बाप दिवसेंदिवस अवघड होत…

Read More Read More

अफगाणिस्तानात तालिबानची अनिर्बंध सत्ता

अफगाणिस्तानात तालिबानची अनिर्बंध सत्ता

येत्या ११ सप्टेंबरला अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षं पूर्ण होतील. तो मुहूर्त साधून अमेरिकेनं अफगाणिस्तानातले उरले सुरले २४०० सैनिक माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तालिबानच्या मागणीवरून घेण्यात आलेला आहे, तालिबानच्या हातात सत्ता सोपवायला या निर्णयान अमेरिकेनं मान्यता दिली आहे. नेटो संघटनेचे सुमारे ७ हजार सैनिक अफगाणिस्तानात शिल्लक रहातातच. तेही बहुदा त्यांच्या त्यांच्या देशात परततील. ही घटना आशियातल्या राजकारणावर दूरगामी परिणाम घडवून आणणार आहे. अफगाणिस्तानात पुन्हा अराजक माजेल;  पाकिस्तान, चीन, रशिया इत्यादी देश  पुन्हा अफगाणिस्तानात आपापले अड्डे जमवतील अशी दाट शक्यता दिसते…

Read More Read More

शाकाहारींनो हे मांस बिनधास्त खा

शाकाहारींनो हे मांस बिनधास्त खा

शाकाहारींनो हे मांस बिनधास्त खा  वातावरण बदलाची समस्या विक्राळ स्वरूप धारण करू लागल्यावर २००६ साली राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती संघटनेनं  एक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानं सांगितलं की वातावरणातला घातक ग्रीन हाऊस वायूपैकी १८ टक्के वायू  पशुपालन उद्योगातून निर्माण होतो.  कार, विमानं, जहाजं, रेलगाड्या इत्यादी एकत्रितपणे जेवढा घातक वायू सोडतात त्या पेक्षा पशुपालनात निर्माण होणारा वायू जास्त आहे.   दूध आणि मांसासाठी गायबैल पोसले जातात.सर्वात जास्त म्हणजे ६० टक्के घातक वायू हे गायबैल  हवेत सोडतात. त्या खालोखाल डुकरं आणि कोंबड्यांचा…

Read More Read More

गंधर्वगोडवा!

गंधर्वगोडवा!

सह्याद्री वाहिनीनं संगीत स्वयंवर नाटक दाखवलं. मी ते पाहिलं.  जरा निवांतीनं पहावं असा विचार करून यू ट्यूबवर गेलो, तिथं ते आणखी दोन वेळा पाहिलं; मधे मधे थांबवत, पुढं मागं करत पाहिलं.  खूपच मजा आली. १९१६ साली मुंबईत सादर झालेलं हे नाटक पहाताना आनंद कां झाला?  पण तो विचार करण्याच्या आधी सादर केलेल्या नाटकाबद्दल बोलायला हवं. सह्याद्रीनं दाखवलेल्या नाटकाचे दिक्दर्शक आहेत प्रमोद पवार. साधारणपणे १९१६ नंतर वीसेक वर्षं या नाटकाचा प्रयोग जसा कसा  झाला असेल तसाच दाखवण्याचा प्रयत्न दिक्दर्शक प्रमोद पवार…

Read More Read More