इस्रायल-लेबनॉन तणाव
गोलन हाईट्स या इसरायली विभागात, मजदाल शाम्स या शहरात, सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी एक रॉकेट कोसळलं. शहराच्या दाटीवाटीच्या वस्तीत असलेल्या खेळाच्या मैदानात. मुलं खेळत होती. रॉकेट येताय असं सांगणारा सायरन वाजला. सायरन वाजला की पळायचं, सुरक्षित ठिकाणाचा आश्रय घ्यायचा हे मुलांना माहित होतं. मुलं साधारणपणे १० ते १६ वर्षं या वयोगटातली होती. मैदानाला तीन पुरुष उंचीचं जाळीचं कुंपण होतं. त्यातून बाहेर पडून जवळ असलेल्या इमारतींमधे जावं लागणार होतं. काही मिनिटं सहज लागली असती.काही मुलांनी पळायची तयारी केली. काही मुलं…