Browsed by
Author: niludamle

कोणीही जिंको, लोकशाही पराभूत होतेय

कोणीही जिंको, लोकशाही पराभूत होतेय

आज सहा तारीख आणि शुक्रवार. अमेरिकेत तीन तारखेला मंगळवारी मतदान झालं. अजूनही पूर्ण निकाल आलेला नाही. १० कोटी लोकांनी मतदानाच्या दिवसाच्या आधीच मतं टाकली होती, पोस्टात किंवा मतपेटीत. ती मतं आता मोजली जात असल्यानं मोजणी रेंगाळत आहे. सामान्यतः रिपब्लिकन माणसं मतदानाच्या दिवशी मतं टाकतात. डेमॉक्रॅट्स आधी मतदान करतात. यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन डेमॉक्रॅटिक पक्षानं आधी मतदान करण्यावर भर दिला होता. ती मतं आता मोजली जात असल्यानं कल डेमॉक्रॅट उमेदवाराची मतं वाढण्याकडं दिसतो. तो कल टिकला तर अगदी कमी फरकानं…

Read More Read More

कराचीतला राडा

कराचीतला राडा

कराची वरवर कां होईना आता थंड झाली आहे. कराचीतले (सिंध राज्य) पोलिस आणि पाकिस्तान सरकारचं निमलष्कर रेंजर्स यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. तो आता थंडावला आहे. केंद्रातलं सरकार विरुद्ध राज्यातलं सरकार यांच्यातला संघर्ष असं कराचीच्या धमालीचं रूप आहे. केंद्रात इम्रान खान यांच्या तहरीके इन्साफ पाकिस्तान या पक्षाचं सहा पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. सिंध मधलं राज्य सरकार पीपल्स पार्टीचे मुराद अली शहा यांच्यासह इतर पाच विरोधी पक्षांचं सरकार आहे. केंद्रातलं सरकार आणि सिंध मधलं सरकार यांच्यात सतत राजकीय संघर्ष असतो. केंद्र…

Read More Read More

लॉकडाऊनमधेही चित्रपट करता येतो

लॉकडाऊनमधेही चित्रपट करता येतो

 झूम कॉन्फरन्सवर केलेला सिनेमा-होस्ट ।। पडद्यावर लॅपटॉपचा स्क्रीन दिसतो. पाच मैत्रिणी आणि एक मित्र असे सहा जण झूम कॉन्फरन्स सुरु करतात.  सेलन नावाची बाई पडद्यावरच्या एका चौकोनात दिसते. ती इतरांच्या साक्षीनं एका मेलेल्या माणसाच्या आत्म्याला झूमवर संवाद करायला बोलावते. आत्माच तो. तो दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व झूमवरच्या मित्रांना कळू लागतं. हा आत्मा या सर्वांशी बोलणार असतो, त्यांचे प्रश्न जाणून घेणार असतो, त्यांच्या अडचणी सोडवणार असतो. सिआन्स नावाचा हा विधी युरोपच्या लोकपरंपरेत आहे, त्यात अशा रीतीनं माणसं एकत्र येतात आणि…

Read More Read More

कमला हॅरिस पाकिस्तानी?

कमला हॅरिस पाकिस्तानी?

कमला हॅरिस पाकिस्तानी आहेत, मुसलमान आहेत असा मेसेज सोशल मिडियात फिरत आहे.     कोणीही व्यक्ती पाकिस्तानी आणि मुसलमान ठरली  की आपोआप ती टाकाऊ, देशद्रोही वगैरे होते, निवडणुकीच्या व्यवहारातून बाद होते असं काही माणसं मानतात. जगात सर्वत्र, अमेरिकेतही. अमेरिकेतले भारतीय मतदार डोळ्यासमोर ठेवून आणि भारतातल्या भक्तगणांना आनंद मिळावा यासाठी कमला हॅरिसबद्दलचा मेसेज पसरवला जातोय. कमला हॅरिस सेनेटर आहेत. कमला हॅरिस अॅटर्नी जनरल म्हणजे कायदे मंत्री होत्या. त्यांच्या नागरीकत्वाचे तपशील उघड आहेत, हज्जारो ठिकाणी नोंदले गेलेले आहेत, सिद्ध झालेले आहेत.  कमला…

Read More Read More

‘ कोविड ‘ वर दोन डॉक्युमेंटऱ्या

‘ कोविड ‘ वर दोन डॉक्युमेंटऱ्या

कोरोना हा येवढा मोठा आणि गुंतागुंतीचा विषय आहे की त्यावर डॉक्युमेंटरी किंवा फिल्म करण्याचा मोह कोणालाही होईल. पण चित्रीकरणात अडचणी फार आहेत. चित्रीकरण करणारी माणसं संघटीत करणं फार कष्टाचं आणि जोखमीचं आहे. पण घटना घडत असताना त्या चित्रीत होणंही तितकंच महत्वाचं असतं. या पेचातून वाट काढून दोन डॉक्यूमेंटऱ्या पडद्यावर आल्यात.   टोटली अंडर कंट्रोल ही अमेरिकन डॉक्युमेंटरी डोनल्ड ट्रंप यांनी कोविड साथ कशा प्रकारे हाताळली ते दाखवते. ३ जानेवारी २०२० राजी  डॉ. रॉबर्ट रेडफील्ड यांना कोविडचा प्रसार झालाय  हे माहित होतं….

Read More Read More

ट्रंप बायडन चर्चा, धड करमणूकही नाही, धड ज्ञानही नाही.

ट्रंप बायडन चर्चा, धड करमणूकही नाही, धड ज्ञानही नाही.

डोनल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात झालेल्या  टीव्ही चर्चेमुळं अमेरिकेच्या भवितव्याबद्दल शंका आणि निराशाच पदरी पडली. दोघेही सत्तरी पार केलेले, एक गडी प्रेसिडेंट, एक गडी आठ वर्ष व्हाईस प्रेसिडेंट. दोघे करोडो लोकांच्यासमोर भांडतांना दिसतात हे काही देशाच्या चांगल्या भवितव्याचं लक्षण नव्हे.  अमेरिकेसमोरचे पाच मुख्य प्रश्न घेऊन त्यावर दोघांनी दीड तास बोलावं अशी योजना होती. अर्थव्यवस्था, शांतता, पर्यावरण, कोविड वंशवाद अशा  प्रश्नावर दोघांनी प्रथम दोन दोन मिनिटात बाजू मांडावी आणि नंतर उरलेल्या वेळात चर्चा करावी अशी योजना होती. ट्रंप सतत खोटं…

Read More Read More

कोविड, ट्रंप आणि वुडवर्ड यांचं नवं पुस्तक

कोविड, ट्रंप आणि वुडवर्ड यांचं नवं पुस्तक

Rage Bob Woodward Simon & Schuster || बॉब वुडवर्ड यांच्या १९ पुस्तकांपैकी किमान १० पुस्तकं तरी त्या त्या वेळी बेस्ट सेलर च्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिली आहेत. प्रस्तुत रेज हे पुस्तक त्या परंपरेला अपवाद नाही. वुडवर्ड बातमीदार आहेत. एकादी बातमी ते घेतात, तिला चिकटतात आणि त्या बातमीतलं बातमीपण संपेपर्यंत त्या बातमीचा पिच्छा सोडत नाहीत. १९७२ सालच्या जून महिन्यात चार दरोडेखोर वॉटरगेट या इमारतीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या कचेरीत घुसले या घटनेच्या बातमीला वुडवर्ड चिकटले आणि १९७४ च्या ऑगस्ट महिन्यात प्रे. निक्सन यांना…

Read More Read More

अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारी चलाखी

अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणारी चलाखी

कोविडनं निर्माण केलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सरकारनं छोट्या उद्योगांना ३ लाख कोटींचं कर्ज देऊ केलं आहे. हे कर्ज कमी व्याजाचं असेल.कल्पना अशी की हे पैसे बंद पडलेल्या उद्योगांनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊन व इतर देणी भागवून व कच्चा माल इत्यादीत गुंतवून पुन्हा उद्योग सुरु करावेत. चौकशी केल्यानंतर जे समजतं ते विचित्र आहे. बँकांनी वरील पैसा उद्योगांना दिला खरा पण त्यांच्यापैकी बहुतांश लोकांनी तो पैसा आपली जास्त व्याजाची कर्जं फेडण्यासाठी वापरला, उद्योग सुरु करण्यासाठी नाही. म्हणजे सरकारनं जुनं नवं केलं.  सहकारी…

Read More Read More

बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल

बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल

यिरी मेंझेल हा झेक दिग्दर्शक नेटकाच वयाच्या ८२ वर्षी वारला. त्याच्या क्लोजली वॉच्ट ट्रेन्स या चित्रपटाला १९६६ साली ऑस्कर मिळालं होतं.  भारतात परदेशी चित्रपट खूप कमी पाहिले जातात, झेकोस्लोवाकिया नावाचा देश आहे हेही माहित नसलेले लोक फार. त्यामुळं यिरी मेंझेलनं केलेले चित्रपट भारतीय माणसाला परिचित नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पहाणाऱ्या प्रेक्षकांना मेंझेल फार आवडला होता. क्लोजली वॉच्ट ट्रेन्स . अगदीच आडवाटेला असलेलं रेलवे स्टेशन. दिवसातून तीन चार डब्यांची एकादी गाडी येते जाते. तिच्यातून चार दोन माणसांची चढउतार होते. स्टेशनात सगळी…

Read More Read More

प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन. सर्वांना मतं हवीयत.

प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन. सर्वांना मतं हवीयत.

खरं म्हणजे प्रकाश आंबेडकर हे डॉ. आंबेडकरांचे अनुयायी.  त्यांना देवाधर्माबद्दल आस्था असण्याची अपेक्षा नाही. मतदार, हिंदू पंथ मानणारे, आपल्याकडं यावेत यासाठी त्यांनी पंढरपूरचं मंदीर उघडावं यासाठी  सत्याग्रह केला. काही तासांचाच. हज्जारो माणसं गोळा केली.  अपेक्षेप्रमाणं सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व यथावकाश विचार करून मंदीराचे दरवाजे उघडू असं सांगितलं. लॉकडाऊन हळूहळू कधी तरी उघडायचं होतंच, त्या वेळापत्रकात पंढपुरच्या विठोबाला सरकारनं घातलं. येवढंच.  प्रकाश आंबेडकर आणि सरकार, दोघंही खुष. प्रकाश आंबेडकरांच्या सत्याग्रहाच्या वेळी लोकं अंतर बाळगणं, मास्क लावणं इत्यादी गोष्टींकडं पूर्ण…

Read More Read More