Browsed by
Author: niludamle

राजकारणासोबत, राजकारणानादी नव्हे, अजीत नरदे.

राजकारणासोबत, राजकारणानादी नव्हे, अजीत नरदे.

राजकारणासोबत,  राजकारणानादी नव्हे शेती आणि शेतकरी हितासाठी झटणारे अजित नरदे यांचं  जयसिंगपूर या त्यांच्याच रहात्या  गावी  निघन झालं. एका  मोटार सायकलनं त्याना उडवलं. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर फार लोक स्तब्ध झाले. ज्या दिवशी त्यांना मोटारसायकलनं उडवलं त्याच दिवशी त्यांचं शेती प्रश्नावर मुंबईत भाषण व्हायचं होतं. नरदे यांना ओळखणाऱ्या माणसांकडं त्यांचं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. कारण संपर्कात एकादं माणूस आलं की नरदे त्या माणसाला सोडत नसत, मागं लागून  त्या माणसाला कामाला लावत, त्यांच्यासोबत काम करत. काहीशा अनाकर्षक पद्धतीनं बोलत बोलत ते…

Read More Read More

गुन्ह्यांत गुंतलेल्या अमेरिकेचं दर्शन-आयरिशमन.

गुन्ह्यांत गुंतलेल्या अमेरिकेचं दर्शन-आयरिशमन.

स्कॉर्सेसींच्या  आयरिशमन या चित्रपटाला २०२०च्या ऑस्करची उत्तम चित्रपटासह एकूण १० नामांकनं मिळाली आहेत. हा चित्रपट   नेटफ्लिक्सवर पहायला मिळतो.  खून मारामाऱ्या करणारा फ्रँक शीरन या चित्रपटाचा नायक आहे. शीरन आता शेवटले दिवस मोजतोय. मरणानंतर कुठल्या पेटीत आपल्याला घालावं, आपली कबर कशी असेल याची व्यवस्थाही त्यानं करून ठेवलीय. एक प्रीस्ट फ्रँकला भेटतो आणि केलेल्या गुन्ह्यांची कबूली दे असं ख्रिस्ती प्रथेनुसार सांगतो. हा गडी गुन्हा कबूल करायला तयार नाही. पत्रकार येतात आणि म्हणतात की आता शेवटले काही दिवसच उरलेत आता तरी तू…

Read More Read More

राजवाड्यातून बाजारपेठेत

राजवाड्यातून बाजारपेठेत

राजवाड्यातून बाजारात. ब्रीटनचा राजपुत्र हॅरी, राजा होऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या  रांगेतला सहावा माणूस, त्याची पत्नी मेगन, राजवाड्याच्या बाहेर पडलेत.  त्यांची आजी, राणी एलिझाबेथनं,  राजघराण्याच्या जबाबदारीतून त्यांना मोकळं केलंय. त्याना यापुढं हीज रॉयल हायनेस आणि हर रॉयल हायनेस हे शब्द त्यांच्या नावामागं जोडता येणार नाहीत. तसंच त्यांचा खर्च इथून पुढं राजवाड्यातून होणार नाही. १९३८ साली आठव्या एडवर्डनं एका घटस्फोटित महिलेशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर त्याला राजेपद सोडावं लागलं होतं. त्याच घटनेची एक वेगळी आवृत्ती निघतेय. फक्त यात वाद नाहीये, राजपुत्रानं स्वखुषीनं राजवाड्याच्या…

Read More Read More

नरेंद्र मोदी. शिवाजी. हिटलर.

नरेंद्र मोदी. शिवाजी. हिटलर.

वर्तमान पत्रात फोटो झळकला. आजचा शिवाजी, नरेंद्र मोदी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा. भगवे दुपट्टे खांद्यावर मिरवत भाजपच्या माणसांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. प्रकाशन भाजपच्या कार्यालयात झालं. पुस्तकात शब्दांनी तुलना केली आहेच परंतू मोदींचा फोटो आणि शिवाजी महाराजांचं रेखाचित्र एकमेकाशेजारी ठेवून दोघांचं सारखेपण ठळकपणे व्यक्त केलंय. आपण कौतुकानं आपल्या मुलाबाळामित्रांची तुलना मोठे लोकं, संत, देव इत्यादींशी करत असतो. राग आला की त्यांची तुलना दुष्ट माणसांशी करतो. पण हे सारं आपण सीरियसली घेत नाही. शरद पवारांना जाणता राजा असं म्हटलं गेलं.  शरद पवार…

Read More Read More

सोलेमानी यांची हत्या.कोण दहशतवादी? कोण सैतान? कोण भला देश आणि कोण सज्जन देश?

सोलेमानी यांची हत्या.कोण दहशतवादी? कोण सैतान? कोण भला देश आणि कोण सज्जन देश?

कासिम सोलेमानी यांना अमेरिकन ड्रोननी बगदाद विमानतळाबाहेर ठार मारलं. मेजर जनरल सोलेमानी इराणचं दोन नंबरचं व्यक्तिमत्व असल्यानं इराण सूड घेणार आणि अमेरिका प्रतीसूड घेणार असं जगाला वाटलं. तिसरं महायुद्ध सुरु होतंय की काय अशी भीती जगभर पसरली. इराणनं दंडातल्या बेंडकुळ्या दाखवण्या पलिकडं मोठी हाणामारी केली नाही. ट्रंप यांनी इराणला तोंडी धमक्या दिल्या. येवढ्यावर तूर्तास तरी प्रकरण निभावलंय. इराण हा दहशतवादी देश आहे, सोलेमानी हा एक भयंकर दहशतवादी होता, सोलेमानी हज्जारो अमेरिकनाना मारू पहात होता असं ट्रंप म्हणाले. अमेरिका हा इस्लाम…

Read More Read More

सध्या जिवंत दोन पोप: त्यांच्यातले संघर्ष आणि संवाद.

सध्या जिवंत दोन पोप: त्यांच्यातले संघर्ष आणि संवाद.

टू पोप्स या नावाची फिल्म मुंबईच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्सवात दाखवली गेली. चित्रपटाचे मर्यादित खेळ झाले याबद्दल चुटपुट लागून असतानाच कळलं की तो चित्रपट नेटफ्लिक्सवर येतोय. तसा तो आलाही. एक पोप निवृत्त होतात. पोपनं निवृत्त व्हायची परंपरा नसतांनाही. कारण आपण पाप केलंय, आपण आता शरीराच्या हिशोबात कामं पार पाडायला असमर्थ आहोत असं त्याना समजलेलं असतं. तू निवृत्त हो असा संदेश त्यांच्याशी अबोला धरून परमेश्वरानं त्यांना दिलेला असतो. त्यांच्या जागी नव्या पोपची निवड होते. पण प्रकरण इतकं साधं नसतं.  निवृत्त होणारे पोप…

Read More Read More

राजीव गांधींचा खून, कां व कसा.

राजीव गांधींचा खून, कां व कसा.

राजीव गांधींचा खून कां झाला? राजीव गांधी-कारण-राजकारण. ले. नीना गोपाल. मनोविकास प्रकाशन. )( १८१५ साली ब्रिटिशांनी डचांकडून श्रीलंका घेतली. कारभार चालवण्यासाठी तेव्हां भारतातल्या तामिळनाडूतले तमिळ त्यांना उपयोगी ठरले कारण तमिळ लोकं इंग्रजी शिकलेले होते, कारभार-साहित्य इत्यादी बाबतीत तरबेज होते. १९४८ साली लंका स्वतंत्र झाली तेव्हां लंकेतल्या सरकारी नोकऱ्यांतल्या ६० टक्के नोकऱ्यात तमिळ होते, विद्यापीठांत त्यांचंचं वर्चस्व होतं. लोकसंख्येत १५ टक्के असले तरी तमिळाना वाटे की लंका हा त्यांचाच देश आहे.  लंका हा बहुसंख्य सिंहलींचा, बौद्ध धर्मियांचा देश. १९५६ साली लंकेनं…

Read More Read More

या आंदोलनाचा अर्थ काय?

या आंदोलनाचा अर्थ काय?

गेल्या आठवड्यात भारतभर विद्यार्थ्यांनी  नागरीकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला. पोलिसांनी त्याना बडवून काढलं. वसतीगृह, ग्रंथालयात घुसूघुसू पोलिसांनी त्यांना बदडलं. पोलिसांसारखा वाटावा असा वेश करून हिंदुत्ववादी गुंडांचाही त्या कामी वापर करण्यात आला. हा नागडा उघडा फॅसिझम इतका असह्य होता की देशभर लाखो नागरीक रस्त्यावर आले, त्यांनी आंदोलन केलं. सुरवातीला हे आंदोलन विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवण्यासाठी होतं, नंतर ते नागरीकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात परिवर्तीत झालं.  अगदी सुरवातीपासून सुधारणांना झालेला विरोध नराजकीय होता. आसाम, मिझोरम, अरूणाचल, त्रिपुरा या ठिकाणचे नागरीक आंदोलनात उतरले होते कारण…

Read More Read More

नागरीकत्व सुधारणा विधेयक. अंगाशी आलेली राजकीय उठाठेव.

नागरीकत्व सुधारणा विधेयक. अंगाशी आलेली राजकीय उठाठेव.

नागरीकत्व सुधारणा विधेयक भाजपनं वाजत गाजत मंजूर केलं. अनेक वर्षांपूर्वी शेजारी देशांत छळाचा बळी ठरणाऱ्या हिंदूना भारतात आश्रय देऊन आपण त्यांना न्याय दिला असं भाजपचं म्हणणं आहे. भारतात आणि जगातच हिंदूवर अन्याय होतोय आणि भाजपच केवळ हिंदूना न्याय देतो असं सांगण्यासाठी सुधारणा विधेयकाचा वापर भाजप करत आहे. हिदूंचा शेजारी देशात छळ होण्याला काँग्रेस जबाबदार असं सांगण्यासाठी हे आणखी एक निमित्त भाजपनं वापरलं.  खरोखरच हे विधेयक भाजपनं हिंदूंना न्याय देण्यासाठी आणलं कां? घटना क्रम पाहिला तर भाजपचा हा दावा फोल ठरतो….

Read More Read More

इराण. आपल्याला दुःखात लोटणारं सरकार जनतेला नकोय.

इराण. आपल्याला दुःखात लोटणारं सरकार जनतेला नकोय.

इराणी नागरिकांच्या आंदोलनानं  १६ नोव्हेंबर रोजी  शिखर गाठलं. त्या दिवशी इराणभर,  खेड्यात आणि शहरांत, १०० ठिकाणी माणसं रस्त्यावर उतरली. त्यात शेतकरी, कामगार, वकील, इंजिनियर, डॉक्टर, व्यापारी इत्यादी सर्व थरातली मंडळी होती. आंदोलकांची  संख्या २ लाखांच्या आसपास होती. आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं तीन दिवस इंटरनेट बंद केलं होतं. सरकारनं दिलेली माहिती अशी. नागरिकांनी ५० लष्करी आणि पोलिस ठाणी, १८३ पोलिसांच्या गाड्या, ७३१ बँका, ७० पेट्रोल पंप, ९ मशिदी आणि १०७६ बाईक्सवर हल्ले केले, जाळपोळ केली, तोडफोड केली, ३०७ खाजगी कार आणि ३४…

Read More Read More