Browsed by
Author: niludamle

बायडननी माघार कां घेतली?

बायडननी माघार कां घेतली?

प्रेसिडेंट जो बायडन प्रेसिडेंट पदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. २१ जुलैच्या २०२४ च्या दुपारी त्यांनी रिंगणातून बाहेर पडल्याची घोषणा केली. पहिली टर्म संपल्यानंतर दुसऱ्या टर्मसाठी ते निवडणुक लढवत होते.  सत्ताधारी आपणहून सत्ता सोडतो असं सहसा होत नसतं.कारण खूप मेहनत करून तो सत्तेत पोचलेला असतो. सत्ता हे एक व्यसन असल्यानं सत्ता सोडणं आणखीनच कठीण असतं. मंडेलांनी आपणहून सत्ता सोडली होती. झेकोस्लोवाकियाचे अध्यक्ष वास्लाव हावेलनी ‘पुरे झालं’ म्हणून सत्ता सोडली होती.अँजेला मर्केल चॅन्सेलरपदी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि सत्तेत घट्ट रुतल्या असतांनाही त्यांनी निवडणुक…

Read More Read More

रविवार/ निवडणूक एक टाळता येत नाही असा जुगार

रविवार/ निवडणूक एक टाळता येत नाही असा जुगार

२०२४ च्या ब्रिटीश निवडणुकीत मजूर पक्षाचे कीर स्टार्मर ब्रीटनचे प्रधान मंत्री झाले. २०१० मधे सत्तारूढ झालेल्या हुजूर पक्षाला ब्रिटीश मतदारांनी सत्तेतून हाकललं. मजूर पक्षाला ३४ टक्के मतं मिळाली पण लोकसभेच्या दोन तृतियांश, ४११ जागा, मिळाल्या.एक तृतियांश मतं आणि दोन तृतियांश जागा. हुजूर पक्षाला २४ टक्के मतं मिळाली पण १२१ जागा मिळाल्या. १२ पक्ष निवडणुक लढवत होते. शिवाय काही अपक्षही होते. अनेक पक्ष, अनेक उमेदवार निवडणुकीत असले की सत्तर टक्के जनतेचा विरोध असूनही  सरकार स्थापन होतं. १९२४ साली, शंभर वर्षांपूर्वी पहिल्या…

Read More Read More

पुस्तकं/डार्विनच्या पत्रांचा संग्रह

पुस्तकं/डार्विनच्या पत्रांचा संग्रह

डार्विनची १६ हजार पत्रं. विश्वाचा उत्क्रांती सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन (१८०९-१८८२) यांच्या पत्रव्यवहाराचा ३० वा खंड नुकताच प्रसिद्ध झाला. सगळे खंड छापील आहेत, डिजिटल आहे, ऑन लाईन उपलब्ध आहेत. ऑन लाईन खंड वाचण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही.  या संग्रहात १६ हजार पत्रं आहेत.  चार्ल्स डार्विन दररोज पत्र लिहित असत. आलेली पत्रं तारेत घालून ठेवत. तारा भरून जात. मग काही पत्रं डार्विन जाळून टाकत. डार्विन यांचा जगाशी आणि ज्ञानाशी संबंध टिकला तो त्यांच्या पत्रांमधून. डार्विन यांचा पत्रव्यवहार अनेकांगी होती. त्यात…

Read More Read More

असांज सुटला

असांज सुटला

अमेरिकन सरकार वृत्तपत्रांच्या गळ्यापासून एका इंचावर. ।। जुलियन असांज जवळपास १२ वर्षांच्या तुरुंगवासातून अखेर मुक्त झाला. सरकारांनी गुप्त ठेवलेली माहिती चोरून ती वर्तनामपत्रांना देणं हा आरोप असांजवर होता. २०१२ साली असांजनं अमेरिकन कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी लंडनमधल्या इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला. इक्वेडोरमधे राजकीय उलथापालथ झाल्यानंतर इक्वेडोरनं असांजला आश्रय नाकारला. असांज लंडनमधल्या तुरुंगात रवाना झाला. परवा त्याची सुटका झाली, तो आपल्या ऑस्ट्रेलियातल्या घरी परतला.  असांज ऑस्ट्रेलियाचा नागरीक आहे.  ।। हेरगिरी कायद्याचा भंग केल्याचा आरोप मान्य करून जुलियन असांजनं अमेरिकन सरकारला वृत्तपत्रांचा गळा…

Read More Read More

सिनेमे/ ‘महाराज’ एक हिंदू सिनेमा

सिनेमे/ ‘महाराज’ एक हिंदू सिनेमा

महाराज.  सिद्धार्थ मल्होत्रानं केलेला महाराज हा चित्रपट एका परीनं धाडसी आहे. महाराज स्फोटक आहे. एका हिंदू पंथाच्या महाराजावर तो बेतलेला आहे. हा महाराज गुन्हेगार होता. त्यानं स्त्रियांना उपभोगलं आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या लोकांना त्यानं ठार मारलं, छळलं. त्याचं वागणं कायदा मोडणारं होतं. हा महाराज कृष्णभक्तांच्या वैष्णव पंथातल्या एका उपपंथाचा महाराज होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वैष्णव पंथियानी चित्रपटावर बंदीची मागणी केली. चित्रपट ओटीटी फलाटावर, नेटफ्लिक्सवर असल्यानं दंगा करणं तर अशक्य होतं.  निर्मात्यानं हुशारीनं हा चित्रपट सिनेघरात दाखवलाच नाही. गुजरातेत तर…

Read More Read More

रविवार/गाझा दुर्दशा

रविवार/गाझा दुर्दशा

गाझातल्या नुसीरत निर्वासित वस्तीत दोन फ्लॅट्समधे चार ओलीस हमासनं लपवून ठेवलेत अशी खबर इसरायलच्या इंटेलिजन्स विभागाला मिळाली. इमारत भर वस्तीत होती. इसरायलचे कमांडो वस्तीत घुसले. त्यांचं इमारतीपर्यंत पोचणं सुकर व्हावं यासाठी इसरायलची हेलेकॉप्टर्स आकाशातून गोळ्याचा पाऊस पाडत होती. कमांडोही वाटेत दिसेल त्याला मारत सुटले होते. पोलिस, कमांडो, लष्करी सैनिक अशांनी एकत्रितपणे ही कारवाई चालवली. कमांडोनी चार ओलिस बाहेर काढले. त्यांना सुरक्षीतरीत्या गाझाबाहेर काढणं हीही मोठी कामगिरी होती. गाझातली जनता आणि हमासचे सैनिक विरोध करत होते. हेलेकॉप्टर्स आणि सैनिक धुँआधार गोळीबार…

Read More Read More

पुस्तकं/ चिंता विकाराचा प्रसार

पुस्तकं/ चिंता विकाराचा प्रसार

पुस्तक   :  The Anxious Generation: How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness        लेखक   :  Jonathan Haidt प्रकाशक : Allen Lane # मानसीक विकार (डिसॉर्डर) झाल्यास त्यावर उपचार करता येतात, ते विकार आटोक्यात आणता येतात हे भारतात फार कमी लोकांना माहित असतं.  आपल्याला किंवा कोणालाही मानसीक विकार झाला आहे हेही लोकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळं भारतात किती माणसं मानसीक विकारानं ग्रस्त आहेत हे नीटसं कळत नाही. चिंता (अँक्झायटी) या विकारानं भारतातले…

Read More Read More

रविवार/ सलमान आणि फतवा, दोघेही जिवंत आहेत.

रविवार/ सलमान आणि फतवा, दोघेही जिवंत आहेत.

सलमान रश्दी  १३ कादंबऱ्या. २ कथासंग्रह. ३ आठवणी. सर्वाधिक गाजलेली कादंबरी-सेटॅनिक व्हर्सेस. २०२४ मधलं ताजं पुस्तक-नाईफ. सलमान रश्दीच्या शैलीचं वर्णन ‘मॅजिकल रिॲलिझम’ या शब्दांत केलं जातं.  सेटॅनिक व्हर्सेसमधे दोघे जण मुंबईतून विमानानं लंडनसाठी निघालेले असतात. दोघे मुंबईतले स्ट्रगलिंग नट आहेत. इंग्लंडमधे जाऊन नशीब काढायचं असा त्यांचा विचार आहे.विमानात एक दहशतवादी असतो. त्याच्याकडं एक बाँब असतो. तो बाँब  चुकून फुटतो. विमान खलास होतं.  ते दोघे पॅराश्यूटनं खाली उतरतात. नंतर इंग्लंडमधे स्थिरावायच्या त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं चित्रपण कादंबरीत आहे. दोघांना पडलेली स्वप्नं हा…

Read More Read More

सिनेमे/ दिक्दर्शक संपलेत, उरलंय ते यंत्र. कॅसोविझ.

सिनेमे/ दिक्दर्शक संपलेत, उरलंय ते यंत्र. कॅसोविझ.

कॅसोविझ हा हॉलिवूड शैलीत फ्रेंच चित्रपट करणारा धडाडीचा फ्रेंच दिक्दर्शक. त्याचे चित्रपट जगभर पाहिले जातात, ते विचार करायला लावणारे असतात. असा हा दिक्दर्शक आता चित्रपट करणं बंद करायचं म्हणतोय. मॅथ्यू कॅसोविझला बोलताना पहाणं म्हणजे एक मजाच असते. मॅथ्यू कॅसोविझ (जन्म १९६७) हा एक फ्रेंच नट आणि दिक्दर्शक आहे. त्यानं दहाएक छोट्या फिल्म केल्यात, दहाएक फीचर फिल्म केल्यात आणि वीसेक फिल्ममधे काम केलंय. त्याच्या मुलाखती यूट्यूबवर सापडतात. सर्व मुलाखतीत त्याची दाढी खुरटलेली असते. ठरावीक लांबीचे केस तो कसे काय कायम टिकवून…

Read More Read More

रविवार. बटलर ब्रीटन.

रविवार. बटलर ब्रीटन.

।। तुमच्याकडं तुम्ही मराठी असूनही समजा हजार दोन हजार कोटी डॉलर असतील; तुम्हाला त्यावरचा कर चुकवायचा असेल; कायदे चुकवत ती रक्कम कुठं तरी गुंतवायची असेल  तर तुम्ही व्हर्जिन आयलंडवर जा. तिथं तुम्हाला भारतातले उद्योगपती, नट, पुढारी, वकील, खेळाडू भेटतील. तिथं पैसे ठेवायला ते तुम्हाला खचितच मदत करतील. ।। साम्राज्यं निर्माण होतात, विलयाला जातात. रोमन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य, ऑटोमन साम्राज्य अशी किती तरी उदाहरणं घेता येतील. भारताच्या हिशोबात इसवी सनामागं साताठ शतकापासून ते थेट इसवी १९४७ पर्यंतच्या काळात पाच पन्नास लहान…

Read More Read More