चीनचे तहहयात अध्यक्ष
सी जिनपिंग यांना कायमचे म्हणजे तहहयात चीनचे अध्यक्ष रहायला परवानगी देणारी घटना दुरुस्ती चीनच्या जनसभेनं मंजूर केली. त्यांना आता कोणीही, कोणत्याही कारणासाठी अध्यक्षपदावरून काढू शकत नाही. याच ठरावात एका विशेष देखरेख आयोगांची निर्मिती करण्यात आली. हा आयोग देशातलं लष्कर, पक्ष, सरकारी यंत्रणा यातला भ्रष्टाचार शोधून काढेल आणि सापडलेल्या लोकांवर कारवाई करेल. अशाच प्रकारच्या कारवाईसाठी आधीच एक समिती चीनमधे आहे. या समितीचं प्रमुखपद सी जिनपिंग यानी स्वतःकडं घेतलं होतं आणि त्या समितीनं केलेल्या तपासानुसार १०० पेक्षा जास्त सैन्यातले जनरल आणि नाविक…