पुस्तकाची एकेक प्रत ३६ लाख डॉलर
सॉदेबीज (sothebey’s) ही कंपनी मौल्यवान वस्तू गोळा करून त्यांचा लिलाव करते. कंपनीची माणसं जगभर फिरून कुठं कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत, कोण काय विकायला तयार आहे, कोणती मौल्यवान वस्तू कुणाकडून मिळवायची याचा हिशोब ही कंपनी करते. व्यवसाय आहे. घेतलेल्या किमतीच्या जास्तीत जास्त पटीत लिलावाची बोली लागली पाहिजे. वस्तूची बाजारात कोणती किमत येईल त्याचा योग्य अंदाज घेणं हे कसब असतं. चांगली किमत येईपर्यंत वस्तू थोपवून ठेवाव्या लागतात. मौल्यवान वस्तूत पुस्तकंही येतात. डेवनशायरच्या डचेस, डेबोरा यांच्याकडल्या वस्तू सोदेबीजनं मिळवल्या. त्यात पुस्तकंही होती. एक…