स्पॅनिश फुटीरता- उपद्व्यापी पुढाऱ्यांची घातक खेळी
कॅटेलोनिया या प्रांताला स्पेनमधून फुटायचं आहे. कॅटेलोनिया या राज्याच्या बार्सेलोना या राजधानीत एक जनमत घेण्यात आलं. त्यात ४३ टक्के लोकांनी भाग घेतला आणि त्यातल्या ९० टक्के लोकानी स्पेनमधून फुटायचा निर्णय घेतला. त्या नुसार बाहेर पडू इच्छिणाऱ्यांनी कॅटोलोनियाच्या विधीमंडळात ठराव करून स्वतंत्र होण्याचा निर्णय जाहीर केला. स्पेन या देशाला कॅटेलोनियानं फुटणं मंजूर नाही. फुटण्याचा विचार आणि ठराव हा स्पेनच्या राज्यघटनेनुसार देशद्रोह आहे असं स्पेनच्या संसदेचं आणि अध्यक्षांचं म्हणणं आहे. स्पेनच्या अध्यक्षांनी कॅटेलोनियाच्या फुटीरवादी पुढाऱ्यांवर देशद्रोहाचा आरोप लावलाय. या आरोपाखाली त्या पुढाऱ्यांना…