Browsed by
Author: niludamle

कोटी कोटी रुपयांची घड्याळं

कोटी कोटी रुपयांची घड्याळं

ऑडेमार पीगे या स्विस कंपनीचं एक नवं मनगटी घड्याळ बाजारात आलंय. त्याची किमत सुमारे सहा लाख डॉलर आहे. घड्याळ म्हटलं की ते कमी जाडीचं हवं, दिसायला सुंदर हवं, पक्की वेळ दाखवणारं हवं, टिकाऊ हवं, वापरायला सोयीचं हवं, मनगटाला पेलवायला हवं. ही सगळी ग्राहकांना हवी वाटणारी वैशिष्ट्यं या घड्याळात आहेतच. पण यातलं प्रत्येक वैशिष्ट्यं अधिक टोकाला नेण्यात आलं आहे. या घड्याळाचा एक विशेष म्हणजे त्याचा गजर. हे घड्याळ गजर करतं, वेळ सांगतं. गजराचा-वेळसांगणीच्या आवाजाची पट्टी, सुरेलपण आणि रचना यावर ऑडेमार पीगेनं…

Read More Read More

अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

अरब, मुस्लीम देशांच्या वैरातली कतार कोंडी

अरब-आखाती-सुन्नी जगातलं अंतर्गत राजकारण आणि व्यवस्था कतारनं ढवळून काढली हे कतारवरच्या बहिष्काराचं मुख्य कारण आहे. सौदी अरेबिया, येमेन, बहारीन, इजिप्त आणि अरब अमिराती या देशांनी कतार बरोबरचे संबंध तोडले आहेत. केवळ दूतावास बंद करून ते देश थांबलेले नाहीत, त्यांनी कतारच्या सरहद्दी बुजवल्या आहेत, बहुदा व्यापार आणि दळणवळण थांबवलं आहे. एका परीनं कतारची कोंडीच करण्यात आली आहे. आपल्याच प्रयत्नामुळं हे सारं घडलंय असं ट्रंप यांनी ट्वीट केलंय. हा निर्णय होण्याआधी नेटके काही दिवस ट्रंप यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला होता. कतार…

Read More Read More

नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

नुसत्या तलवारीनं नव्हे, कानांचा वापर करून शत्रू नमवावा लागेल

ब्रॅड पिटची दी वॉर मशीन नावाची फिल्म नुकतीच प्रदर्शित झाली. नेटफ्लिक्सवर. अमेरिकन  जनरल मॅकक्रिस्टल यांना जनरल पदावरून हाकलणं या घटनेवर आधारलेल्या पुस्तकावर हा सिनेमा आधारलेला आहे. ब्रॅड पिटनं जनरल मॅकमोहनची भूमिका केलीय. मॅकमोहनला अफगाणिस्तानात पाठवलं जातं. मॅकमोहन म्हणतो की त्याला युद्ध करायचं नाहीये, त्याला अफगाणिस्तानची नव्यानं बांधणी करायची आहे. अफगाणिस्तानातली अफूची शेती बंद करून कापूस पिकवायची व्यवस्था मॅकमोहनला करायची आहे. त्याला शाळा काढायच्या आहेत. वगैरे. हे सारं हेलमांड प्रांतातल्या अफगाणांना सांगायला मॅकमोहन जातो तो प्रचंड शस्त्रं घेऊन. त्याच्या भोवताली रणगाडे,…

Read More Read More

शेतकरी संप

शेतकरी संप

एक अटळ गोष्ट घडली. शेतकऱ्यांनी संप केला. संप म्हणजे शेतमाल बाजारात जाऊ देण्याऐवजी रस्त्यावर नष्ट केला. दूध रस्त्यावर ओतलं, भाजीपाला रस्त्यावर ट्रकखाली चिरडला. वरवर पहाता तरी शेतकरी कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली संघटित नाही. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा  ही कित्येक वर्षं जुनीच मागणी शेतकरी करत होता. यंदा तुरीचं भरपूर पीक आलं पण एक तर तुरीला भाव मिळाला नाही आणि सरकारनं चांगल्या भावानं तूर खरेदी केली नाही. शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भरून निघाला नाही. भाजप आणि सरकार म्हणतय की त्यांनी शेतकऱ्यासाठी अनेक योजना…

Read More Read More

कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.

कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व.

कोचीमधलं प्रदर्शन. स्थलांतरितांचं भावविश्व. केरळात कोचीमधे एक द्विवार्षिक प्रदर्शन नुकतंच पार पडलं. त्यात निर्वासित, स्थलांतरीत या विषयावर अनेक चित्रं, कविता, इन्सॉलेशन्स मांडली होती. ।। समाजांना, देशांना सरहद्दी असतात. सरहद्दी लवचीक असतात, बाहेरच्या बाजूला त्या ताणल्या जाऊ शकतात. सरहद्दी सच्छिद्र असतात. नागरीक छिद्रातून बाहेर जाऊ शकतात, आत येऊ शकतात. एके काळी साम्राज्यं असत, त्यांना सरहद्दी असत. सम्राट या सरहद्दी ओलाडून दुसऱ्या प्रदेशात घुसत. कोणाच्या लेखी ते आक्रमण असे तर कोणाच्या लेखी  साम्राज्यविस्तार. साम्राज्य विलयाला गेल्यानंतर देश तयार झाले. देशांना सरहद्दी असतात….

Read More Read More

फ्रेंच अध्यक्ष, आट्यापाट्या खेळाची सुरवात.

फ्रेंच अध्यक्ष, आट्यापाट्या खेळाची सुरवात.

प्रस्थापित राजकीय पक्ष आणि पुढारी उपयोगाचे नाहीत तेव्हां नव्या माणसाला संधी द्यावी अशा विचारानं फ्रेंच जनतेनं एमॅन्युअल मॅक्रॉन या ३९ वर्षाच्या माणसाला फ्रेंच जनतेनं भरपूर मतं देऊन राष्ट्राध्यक्षपदी नेलं आहे. मॅक्रॉन काही महिन्यांपूर्वी समाजवादी पक्षात होते. मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. सध्या त्यांना राजकीय पक्ष नाही. पुढे चला अशी एक घोषणा, कार्यक्रम, त्यानी मांडलाय, तोच आहे त्यांचा पक्ष. फ्रेंच अध्यक्षीय निवडणुक दोन टप्प्यात होते. पहिल्या टप्प्यात अनेक राजकीय पक्षांचे अनेक उमेदवार उभे रहातात. त्यातून सर्वाधिक मतं मिळालेले दोन उमेदवार दुसऱ्या…

Read More Read More

लंडन ते यिवू, १२ हजार किमीचा रेलमार्ग

लंडन ते यिवू, १२ हजार किमीचा रेलमार्ग

लंडनहून १० एप्रिल २०१७ रोजी निघालेली रेलगाडी २९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पश्चिम चीनमधल्या यिवू शहरात पोचली. १२ हजार किमीचा प्रवास या गाडीनं पार पाडला. गाडी दोन दिवस आधीच यायला हवी होती, वाटेतल्या अडचणींमुळं उशीर झाला. गाडीमधे ८८ कंटेनर्स होते. कंटेनर्समधे ब्रीटनची खासमखास स्कॉच व्हिस्की होती, काही यंत्रसामग्री होती, औषधं होती, डिझायनर लोकांनी तयार केलेले खासमखास कपडे होते. चीनमधल्या श्रीमंत लोकांना स्कॉच आवडते आणि लंडनमधे डिझाईन झालेले कपडे आवडतात. वाट्टेल ती किमत मोजायला चिनी माणसं तयार असतात. हा…

Read More Read More

अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं

अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं

अमेरिकेचं आधुनिक वळण दाखवणारी दोन पुस्तकं ०० THE ACCIDENTAL LIFE  .TERRY McDONELL . From Conunterculture to Cyberculture. Fred Turner || १९६० ते १९८० हा वीसेक वर्षाचा काळ अमेरिकन आधुनिक इतिहासाला नवं वळण देतो. या काळात समाजात निर्णायक उलथापालथ झाली. समाजाची आर्थिक, राजकीय आणि तंत्रवैज्ञानिक घडी समांतर वाटेनं जाणाऱ्या तरूणानी विस्कटली. टेरी मॅक्डोनेल यांच्या आठवणी आणि फ्रेड टर्नर यांचा समांतर चळवळीचा आढावा ही दोन पुस्तकं या काळात काय घडलं ते दाखवतात. लेखक गोळा करणं, त्यांना लिहितं करणं हाही संपादनाचा एक पैलू आहे. हा पैलू…

Read More Read More

सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

सुकमा. सैन्य, सीआरपीफ यंत्रणा दहशतवादाशी लढण्यास योग्य नाहीत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी.

दहशतवादाचा न संपणारा छळवाद छत्तीसगड राज्यात सुकमा गावात माओवादींनी केलेल्या गनिमी हल्ल्यात सीआरपीएफचे २५ जवान मारले गेले. सीआरपीएफचे जवान दुपारी एकत्र जेवत होते.  अशा रीतीनं इतक्या जवानांनी एकत्र असणं रणनीतीमधे बसत नाही. सुमारे ३०० माओवाद्यांनी हल्ला केला. आदिवासींना पुढं ठेवून हल्ला करण्यात आला. अचानकपण, माओवादी कोण आणि निष्पाप आदिवासी कोण ते न कळणं, निष्पापांची ढाल या तीन घटकांमुळं सीआरपीला प्रतिकार करण्यात अडचणी आल्या. छत्तीसगडमधे सीआरपीएफ आणि सीमा सुरक्षा दलाचे १५ हजारपेक्षा जास्त सैनिक माओवाद्यांचा सामना करत आहेत. छत्तीसगड राज्याचे पोलिस…

Read More Read More

शेतकरी कर्जमाफी ही पहिली पायरी. दूरगामी अर्थरचना बदल आवश्यक.

शेतकरी कर्जमाफी ही पहिली पायरी. दूरगामी अर्थरचना बदल आवश्यक.

शेतकरी आत्महत्या थांबत नाहीयेत. कर्जं माफ करा अशी काँग्रेस व इतर पक्षांची मागणी आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की कर्ज माफ करून शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, फडणवीस कर्जमाफीला तयार नाहीत. ते विरोधकांना विचारतात, मी कर्जंमाफी करतो, तुम्ही शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची हमी घ्याल काय. उत्तर प्रदेशात शेतकरी आत्महत्या कमी आहेत तरीही तिथल्या भाजप मुख्यमंत्र्यांनी तीसेक हजार कोटींचं कर्ज माफ केलंय. फडणवीस कर्ज माफीला तयार नाहीत कारण  कर्ज माफ करायचं म्हणजे त्या कर्जाची भरपाई करावी लागेल,ते कर्ज देणाऱ्या बँकांना तेवढे पैसे…

Read More Read More