अनारकली ऑफ आरा
स्त्रियांचा मान राखा असं सांगणाऱ्या सिनेमांमधे अनारकली ऑफ आरा या सिनेमानं एक दणदणीत भर घातलीय. अनारकली ही एक गात गात नाचणारी किंवा नाचता नाचता गाणारी कलाकार आहे. ती भोजपूर जिल्ह्यात आरा या गावात रहाते. आसपासच्या गावांत ती कार्यक्रम करते. कधी लग्न प्रसंग, कधी संमेलन, कधी कोणाची तरी हौस. श्रोते असतात बिहारी. खेडवळ असतात. महानगरी संस्कृतीचे बटबटीस संस्कार त्यांनी स्वीकारलेले असतात. त्यांच्या दैनंदिन जगण्यात उसळी मारणाऱ्या आणि बंधनांचं अस्तित्वच नाकारणाऱ्या इच्छा, वासना भागवणारा परफॉर्मन्स अनारकली करत असते. भोजपूरमधल्या रसिकांची एक स्वतंत्र…