Browsed by
Author: niludamle

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं ओळखली जाणारी इमारत

जॉर्ज फर्नांडिस यांच्या नावानं ओळखली जाणारी इमारत

ही इमारत २०४ चर्नी रोड या नावानं ओखळली जात असे. १९६७ ची स.का.पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणुक जॉर्जनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बाँबे लेबर युनियन, म्युनिसिपल मझदूर युनियन इत्यादी अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं. जॉर्ज फर्नांडिस इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द  आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हां गोदीबाहेरच्या फूटपाथवर रहात आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात…

Read More Read More

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

कातीन हत्याकांडाची फिल्म तयार करणारा आंद्रे वायदा

आंद्रे वायदा (Andhrzej Wajda) या पोलिश चित्रपट दिद्गर्शकाचं ९ ऑक्टोबर २०१६ रोजी निधन झालं. वयाच्या नव्वदाव्या वर्षी. वायदानं ४० पेक्षा जास्त चित्रपट केले. थिएटरही केलं. चित्रपट आणि थिएटर अशा दोन्ही ठिकाणी तो आलटून पालटून असे. २००० साली वायदाना मानद ऑस्कर मिळालं. त्यांच्या तीन चित्रपटांना ऑस्कर नामांकनं मिळाली.   वायदाच्या  एका फिल्मचं नाव होतं अॅशेस अँड डायमंडस. पोलंडवरच्या नाझी सत्तेविरोधातल्या लढाईची पार्श्वभूमी होती. सिनेमाच्या शेवटल्या दृश्यात नाझींच्या विरोधात लढणारा कार्यकर्ता कचऱ्याच्या ढिगावर मरून पडलाय. ही फिल्म दाखवण्यात आली त्या १९५८ सालात…

Read More Read More

ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले

ट्रंप निवड, माध्यमांचे अंदाज कां खोटे ठरले

माध्यमांचं भाकित, अंदाज, अभ्यास खोटे ठरले.   डोनल्ड ट्रंप निवडून येणार नाहीत असं अमेरिकन आणि युरोपिय माध्यमांना वाटत होतं.   लॉर्ड मेधनाद देसाई या बहुदा एकट्याच पत्रकारानं   ट्रंप निवडून येतील असं भाकित केलं होतं. ट्रंपना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा दोन लाख मतं कमी पडली हे खरं. ते इलेक्टोरल व्होट या चमत्कारिक अमेरिकन निवडणुक पद्धतीमुळं प्रेसिडेंट झाले हेही खरं. परंतू इतकी मतं ट्रंप यांना मिळतील असं कोणीही माध्यमातलं माणूस माणूस म्हणत नव्हतं. २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी जिंकतील असं माध्यमं म्हणत…

Read More Read More

नेटफ्लिक्सवरच्या मालिका-एक नवा कलाप्रकार

नेटफ्लिक्सवरच्या मालिका-एक नवा कलाप्रकार

   नेटफ्लिक्सनं नार्कोज या मालिकेचा तिसरा सीझन दाखवण्याचं जाहीर केलंय. नार्कोज ही एक स्पॅनिश भाषेतली इंग्रजी उपशीर्षकाची मालिका आहे. या मालिकेचे प्रत्येकी दहा भागांचे दोन सीझन्स झाले आहेत. आता तिसरा सीझन सुरु होतोय. ही मालिका लोकांना तुफ्फान पाहिली कारण ती कोलंबियातल्या पाब्लो एस्कोबार या नशाद्रव्य टोळीच्या प्रमुखावर आहे. कोलंबिया या दक्षिण अमेरिकेतल्या देशात पाब्लो एस्कोबारचं नशाद्रव्यांचं उत्पादन आणि वितरणाचं मोठ्ठं साम्राज्य होतं. कोलंबियात द्रव्यं तयार करून ती अमेरिकेत चोरून पाठवणं आणि तिथून ती जगभर पाठवण्याचा व्यवसाय पाब्लोनं केला. हज्जारो माणसांची…

Read More Read More

शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

शहरांचं रूप बदलणारी व्यवस्था-ऊबर

ऊबर क्रांती।।ऊबर टॅक्सी भारतात गाजली ती दिल्लीतल्या बलात्कार प्रकरणानंतर, एका ऊबर ड्रायव्हरनं बलात्कार केल्यानंतर. मुंबईत ऊबर गाजतेय ती त्या टॅक्सीला काळ्या पिवळ्या टॅक्सीवाल्यांनी केलेल्या विरोधामुळं. ऊबर टॅक्सी एसी असते. सेल फोनवरून ती बोलावता येते. पूर्ण टॅक्सी वापरता येते किंवा इतर सहप्रवासी घेऊन ती स्वस्तात वापरता येते. ऊबर टॅक्स्यांची स्थिती चांगली असते. त्यामुळं मुंबईत ऊबर फार लोकप्रिय झाली. काळीपिवळीचे ड्रायव्हर नकार देतात. टॅक्सी बंद करायची वेळ झालीय, जेवायची वेळ झालीय,तुमच्या दिशेला मला जायचं नाहीये अशा नाना सबबी सांगून काळीपिवळी भाडं नाकारते….

Read More Read More

नवी कादंबरी, माओ ते तिएनानमेन काळाचं चित्रण

नवी कादंबरी, माओ ते तिएनानमेन काळाचं चित्रण

 Do Not Say We Have Nothing Madeliene Thien. || यंदाच्या मॅन बूकर पारितोषिकासाठी सहा पुस्तकं निवडली गेली. मेडलीन थियेनची ‘ डू नॉट से वुई हॅव नथिंग ‘ ही कादंबरी त्या निवडीत होती. समीक्षकांना या कादंबरीला बक्षीस मिळेल असं वाटत होतं. पॉल बीटी याच्या ‘ दी सेल आऊट ‘ या कादंबरीची निवड झाल्यानं मेडेलिनचं बक्षिस हुकलं. ‘ डू नॉट से वुई हॅव नथिंग ‘ या ४७२ पानांच्या कादंबरीत लेखिका मेडलीन थियेन यांनी सुमारे पन्नास  वर्षाचा चीनचा तुंबळ इतिहास चितारला आहे. माओ…

Read More Read More

ऑटोहेड-हिंदी चित्रपटसृष्टीतलं नवं वळण

ऑटोहेड-हिंदी चित्रपटसृष्टीतलं नवं वळण

रोहित मित्तल यांची ऑटोहेड ही फिल्म यंदाच्या मामी चित्रपट उत्सवाच्या स्पर्धेत दाखवली गेली.राम गोपाल वर्मा यांच्या सत्या या फिल्मनं हिंदी चित्रपट जगात एक नवं दालन उघडलं होतं. ऑटोहेडनंही  हिंदी चित्रपटसृष्टीत एक नवी शैली प्रस्तुत केलीय. नारायण नावाचा एक ऑटो चालवणारा माणूस हे मुख्य पात्र. नारायण सहा खून करतो. ते खून तो कॅमेऱ्यासमोर करतो. एक सनसनाटी खरी गोष्ट चित्रीत करून टीव्हीवर नाव कमवायच्या खटपटीत असलेल्या दोघांसमोर नारायण आपली कहाणी सांगतो, आपले विचार मांडतो आणि आपण कसे खून करतो तेही दाखवतो.  नारायण…

Read More Read More

व्यापम प्रकरणाची आठवण

व्यापम प्रकरणाची आठवण

ं    मिहीर कुमार हा तरूण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के सुदर्शन यांच्याकडं काम करत असे. सेवादार होता. त्याची अन्न निरीक्षक, फूड इन्सपेक्टर या पदावर मध्य प्रदेश सरकारच्या खात्यात काम करायची इच्छा होती. त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागते. ही २००७ सालातली हकीकत. मिहीरनं परीक्षेबाबत चौकशी केली, केव्हां, कुठं, विषय कोणते वगैरे.  मिहीरला माहित असावं की परिक्षा देऊन रीतसर नोकरी मिळणं वगैरे खरं नाही, वशीला लागतो, भानगडी कराव्या लागतात. तो तसं सुदर्शनांकडं बोलला नसेल पण त्यानं परीक्षेबाबत मार्गदर्शन करा, ओळख बिळख…

Read More Read More

पुस्तकांचा इतिहास सांगणारं पुस्तक

पुस्तकांचा इतिहास सांगणारं पुस्तक

Books Living History Martyn Lyons ।।  बुक्स, लिविंग हिस्टरी या पुस्तकात लेखक मार्टिन लियॉन्स म्हणतात ” छापील पुस्तकाला बॅटरी लागत नाही. त्याला व्हायरसही लागत नाही. पुस्तक बंद करताना ते सेव्ह करावं लागत नाही, कारण त्यातल्या मजकूर कायम सेव्ह्ड असतो.” ।। वाचक हल्ली टॅब, रीडर,सेलफोन अशा उपकरणावर पुस्तकं वाचतात. त्या उपकरणावर पुस्तकं ऐकताही येतात. इकॉनॉमिक्स या साप्ताहिकाचा सगळा अंक ऐकता येतो. यू ट्यूबवर लेखकांची त्यांच्या पुस्तकांवरची भाषणं ऐकता येतात. दीड दोन तासाच्या भाषणात किंवा वाचकांच्या चर्चेत लेखक आपल्या पुस्तकाबद्दल बोलतात. वरील…

Read More Read More

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा  बॉल डिलनना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल बक्षिसाचा गौरवोल्लेख असा  ” Having created new poetic expression within the great American song tradition.”   यावेळी पारितोषिकासाठी अनेक नावं होती. अनेक वर्षं रांगेत असलेले फिलिप रॉथ होते. हारुकी मुराकामी तर होतेच. डिलनचं नाव कोणाच्याही डोक्यात नव्हतं. कुणकुण लागली तेव्हां न्यू रिपब्लिक या नियतकालिकानं एक लेख लिहिला. शीर्षक होतं – यंदा साहित्याचं नोबेल कोणाला मिळणार? बॉब डिलनला नक्कीच नाही. स्विडीश कमिटीचे अॅकॅडमिक संचालक बॉबला गाठायचा प्रयत्न करत होते.बॉब…

Read More Read More