गाभा हरवलेलं अमेरिकन शिक्षण
नागरीक विवेकी असतील, सहनशील असतील, सज्जन असतील, माणुसकी असलेली असतील तर समाजाचं भलं होतं, समाज विकसित होतो. वरील गुणवैशिष्ट्यं माणसात जन्मतः नसतात, ती त्याच्यामधे विकसित होत असतात. घरातलं वातावरण, समाजातलं वातावरण, वरील गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था आणि माणसं घडवणारं शिक्षण-साहित्य-पत्रकारी हे घटक समाजात सुस्थित असतील तर माणसांमधे वरील गुणवैशिष्ट्यं निर्माण व्हायला मदत होते. हे भान अमेरिकन समाजात (कुठल्याही समाजात) कधी कधी असतं, कधी कधी ते सुटतं. ते भान सुटल्याची अवस्था गेली काही वर्षं अमेरिकेत आहे. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेत तसं दिसतय….