झुंपा लाहिरींचं नवं पुस्तक
झुंपा लाहिरी यांचं दी अदर वर्ड नावाचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. त्या पुस्तकावर खूप चर्चा चाललीय. पुस्तक आहे इटालियन भाषेत. त्याची एक इंग्रजी आवृत्ती निघालीय. या आवृत्तीत डावीकडलं पान इटालीयन भाषेत आणि समोरचं पान इंग्रजीत आहे. इटालियनचं इंग्रजी भाषांतर गोल्डस्टीन या इटालियन भाषांतरकारीनं केलंय. पुस्तकावर भरपूर चर्चा होतेय. अनेकांनी या पुस्तकाचं स्वागत केलंय. एकाभाषेतून दुसऱ्या भाषेत जाण्याच्या प्रयत्नामधे लेखिकेला झालेला त्रास आणि आलेलं अपयश लेखिकेनं प्रामाणिकपणे मांडलंय. अनेक वाचक आणि समीक्षकाना पुस्तक आवडलेलं नाही. त्यांच्या इंग्रजी कादंबऱ्या आणि कथांमधला कस त्यांच्या…