Browsed by
Author: niludamle

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण

 पठाणकोट, पाकचा दहशतवाद आणि भारताचं पाक विषयक धोरण. पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारत पाक शांतता चर्चा तूर्तास स्थगित असल्याचं पत्रकारांना सांगितलंय. ९ नोव्हेंबर २०१५ साली ही चर्चा परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी सुरु केली होती. काश्मिरचा मुद्दा वगळून चर्चा होऊच शकत नाही;  बलुचिस्तानमधल्या बंडाला भारत चिथावणी देत आहे असे आरोप बासित यांनी केले.  चर्चा स्थगितीचं तात्कालिक कारण होतं पाकिस्तानी टीमचा पठाणकोट दौरा.     पाकिस्तानी दौऱ्याच्या बदल्यात भारताचा दौरा असं काहीही ठरलेलं नव्हतं असं बासित म्हणाले.   २०१५…

Read More Read More

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ?

रफाएल विमानं केव्हां येणार ? ।।। आज २०१६ सालचा एप्रिल उजाडतोय. एक वर्षं झालं. एप्रिल २०१५ साली विकत घ्यायचं ठरलेल्या  ३६ लढाऊ रफाएल विमानांच्या  खरेदीचा करारही झालेला नाही, विमानं येण्याचं राहू द्या. १५ एप्रिल २०१५ रोजी फ्रान्सच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरील  विमानं तयार स्थितीत भारताच्या ताब्यात येतील अशी घोषणा केली. दौऱ्यात त्यांच्या सोबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर होते.   रफाएल विमानांचा एकूण लोचाच दिसतोय. २००० साली भारतीय हवाई दलातली मिग-२१ जातीची  विमानं म्हातारी झाली होती, अपघात होत होते. त्यांच्या…

Read More Read More

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

‘एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो’.व्हेलबेकची कादंबरी.

एक मुसलमान माणूस फ्रान्सचा राष्ट्रपती होतो? व्हेलबेक या फ्रेंच कादंबरीकारानं तशी कल्पना करून फ्रेंच समाज कसा बदलू शकतो याचं वर्णन सबमिशन या कादंबरीत लिहिलंय. २०१५ शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या संपादकांना आयसिसच्या जिहादींनी पॅरिसमधे ठार मारलं त्याच दिवशी ही कादंबरी  फ्रेंचमधे प्रसिद्ध झाली. आता या कादंबरीचं इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध झालंय. ।।  व्हेलबेकच्या कादंबरीचा काळ आहे, २०२०. त्या वर्षी फ्रान्समधे सार्वत्रिक निवडणुका होतात. चार पक्ष निवडणुकीत उभे असतात. कोणालाच बहुमत मिळत नाही. पक्षांमधली फूट वापरून, पक्षांच्या आपसातल्या मारामारीचा उपयोग करून मुस्लीम…

Read More Read More

कामसूत्र.

कामसूत्र.

 कामसूत्र. जगाला भारताचं सांस्कृतीक योगदान. THE MARE’S TRAP, NATURE AND CULTURE IN KAMSUTRA हे वेंडी डॉनिजर यांचं पुस्तक  २०१५ मधे प्रसिद्ध झालं आहे. अर्थशास्त्र हा कौटिल्याचा ग्रंथ अभ्यासल्यानंतर कामसुत्राचे नव्याने समजलेले संदर्भ लेखिकेनं या पुस्तकात मांडले आहेत. वात्स्यायनाचं कामसूत्र इसवी तिसऱ्या शतकात पाटलीपुत्रमधे (पाटणा) प्रसिद्ध झालं. तेराव्या शतकात यशोधरानं कामसूत्रावर ‘जयमंगल’ ग्रंथातून भाष्य केलं. १८८३ साली रिचर्ड बर्टननं कामसूत्राचं इंग्रजीतलं भाषांतर लंडन आणि बनारसमधे प्रसिद्ध केलं. त्यानंतरचं डॉनिजरांचं हे पुस्तक.    इसवी पू. २ मनु – धर्मशास्त्र-मनुस्मृती इसवी १ कौटिल्य…

Read More Read More

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.

खून की धर्मकर्तव्य. पाकिस्तानी गोंधळ.  ।। सलमान तासिर या राज्यपालांना मुमताझ काद्री या त्यांच्याच अंगरक्षकानं गोळ्या घालून ठार मारलं. त्या बद्दल काद्री याला पाकिस्तानी न्यायालयानं फाशी दिली. पण पाकिस्तानी जनतेला फाशी मंजूर नाही, त्यानं धर्मकर्तव्य केलं असं तिथल्या लोकांना वाटतं. ।। मुमताझ काद्री या माणसाला १ मार्चच्या पहाटे इस्लामाबाद तुरुंगात फासावर लटकवण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार. सलमान तासिर या पाकिस्तानच्या राज्यपालाला गोळ्या घालून ठार मारल्याचा गुन्हा त्यानं केला होता. काद्री तासिर यांचा शरीररक्षक होता.   पाकिस्तानभर या फाशीविरोधात तीव्र प्रतिक्रिया…

Read More Read More

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

स्पॉटलाईटला दोन ऑस्करं मिळाली

‘स्पॉटलाईट’ ला सर्वोत्तम चित्रपट आणि पटकथा अशी दोन ऑस्करं मिळाली. गेली सातेक वर्षं हा पट  घडत होता. हॉलिवूडमधले पैसेवाले, स्टुडियोंचे मालक या पटात पैसे घालायला तयार नव्हते. मोठमोठे स्टार्स, त्याना अगडबंब पैसे, चित्रीकरणावर भरमसाठ पैसे, वितरणावर भरमसाठ पैसे, जाहिरातबाजीवर पैसे. हे हॉलिवुडचं वैशिष्ट्यं झालंय. या जाचक चौकटीत राहूनही चांगले चित्रपट निघत असतात. (स्पीलबर्ग, स्कॉरसेसे इ).  आशयघन ‘स्पॉटलाईट’ काढणं हॉलिवूडमधे जवळजवळ अशक्य झालंय. स्पॉटलाईटच्या लोकांनी कष्ट करून ते जमवलं. जाहिरात आणि पैसे पाठीशी नसल्यानं या चित्रपटाची वाच्यता झाली नव्हती. ऑस्कर मिळाल्यानंतर…

Read More Read More

ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.

ऑस्कर. सिनेमा स्पॉटलाईट.

स्पॉटलाईट हा चित्रपट यंदाच्या ऑस्करसाठी नामांकित झाला आहे. दिद्गर्शन, उत्तम चित्रपट यासह एकूण ७ नामांकनं या चित्रपटाला मिळाली आहेत. या चित्रपटाबद्ल बोंब दोन कारणांसाठी  झाली. एक म्हणजे चर्चमधल्या गैरव्यवहारावर चित्रपटानं बोट ठेवलं. दुसरं म्हणजे अमेरिकन समाज कसा पक्षपाती असतो ते या चित्रपटानं दाखवलं. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणून ही निर्मिती उत्तम आहे हा स्वतंत्र भाग झाला. हा चित्रपट बिशपांची विकृती उघडी करतो. बॉस्टन या अमेरिकन नगरीत अनेक बिशप लहान मुलांचा लैंगिक विकृत वापर करत असत. बिशप लहान मुलांना देवाची भीती घालून…

Read More Read More

दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल

दहशतवादाचा मुकाबला. सक्षम यंत्रणा नव्यानं उभारावी लागेल

         आधीच्या ब्लॉगमधे भारत सरकार आणि पोलिटिकल एस्टॅब्लिशमेंट दहशतवादाचा मुकाबला करण्यात कां अपेशी ठरते ते लिहिलं होतं. सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं, भारत सरकारचे विविध विभाग दहशतवादाच्या मुळाचा छडा लावत नाहीत, तशी यंत्रणा भारत सरकारजवळ नाही असं त्या ब्लॉगमधे लिहिलं होतं.           स्वातंत्र्यापासून तर १९९० पर्यंत पाकिस्तान सरकार लष्कराचा वापर करून भारताशी लढत होतं. १९९० नंतर पाकिस्ताननं जैशे महंमद, लष्करे तय्यबा यासारख्या खाजगी टोळ्या तयार केल्या, त्याना शस्त्रं दिली, प्रशिक्षण दिलं, पैसे दिले.   काश्मिरात आणि भारतात त्या दहशतवादी टोळ्या पाठवायला…

Read More Read More

अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

१३ डिसेंबर २००१ रोजी ५ जैशे महंमदच्या दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर  हल्ला केला. संसदेत भारत सरकारचे सर्व मंत्री असतात. तीसेक मिनिटं भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात संघर्ष झाला. त्यात पाच दहशतवादी, आठ भारतीय सुरक्षा जवान आणि एक माळी अशी माणसं मारली गेली.  त्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि १५ डिसेंबर २००१ रोजी अफझल गुरु व इतरांना हल्ल्याला मदत करणं या आरोपावरून अटक केली. अटक झाल्यावर दिल्लीच्या डीसीपींनी एका खास खोलीत अफझल गुरुचा कबुली जबाब घेतला. हा जबाब घेताना…

Read More Read More

वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

वाईन ग्लास आणि नग्न पुतळे

  वाईन ग्लास,नग्न पुतळे इराणनं आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे शांततेसाठीच असेल असं मान्य केलं आणि युनोला आपल्या कार्यक्रमावर लक्ष ठेवायला परवानगी दिली. युनोनं इराणवर लादलेले निर्बंध मागं घेतले. व्यापार, तंत्रज्ञान, वित्तपुरवठा आणि उर्जा या चारही बाबतीत जगाशी व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य इराणला मिळालं. काही वर्षं अडकून पडलेले व्यवहार व अनेक देशांशी गोठलेले संबंध सुधारण्यासाठी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी जगाच्या दौऱ्यावर बाहेर पडले. पहिला दौरा युरोपचा. युरोपीय देशांनी इराणमधे पैसे गुंतवावेत, इराणला तंत्रज्ञान द्यावं आणि इराणकडून तेल घ्यावं हे मुख्य उद्देश. पैसा. धंदा. सुरवात…

Read More Read More