वासुदेव बळवंतांचं कीर्तनचरित्र
क्रांतीकारक वासुदेव फडके यांचं कीर्तनचरित्र |||| क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचं निधन १८८७ साली एडनच्या तुरुंगात झालं. त्यांचं १९५२ साली लिहिलेलं चरित्र नुकतंच बडोद्यात हाती लागलं. हे चरित्र म्हणजे रूढार्थाचं चरित्र नाही. ते कीर्तनाच्या रुपात लिहिलेलं आहे. लेखक कीर्तनकार असल्यानं त्यांनी कीर्तनाचा फॉर्म निवडला. विषय वासुदेव बळवंत फडके. काव्याच्या भोवती गुंफलेला.अभंग. त्या अभंगाचं निरूपण. विषय ओळख. नंतर ओवी. ओवीचा अर्थ. विषय. नंतर आर्या. विषय. पोवाडा. विषय. अशा रीतीनं आख्यान पुढं सरकतं. असं करत करत ३२८ पानांचं पुस्तक संपतं. अभंग, आर्या,…