Browsed by
Author: niludamle

पाकिस्तान-लश्कराचं वर्चस्व कां? लष्कर सर्वेसर्वा कां?

पाकिस्तान-लश्कराचं वर्चस्व कां? लष्कर सर्वेसर्वा कां?

डेली टाईम्स या लाहोरहून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकाचे संपादक रशीद रहमान यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानातलं लष्कर काम करू देत नाही, लेख आणि बातम्या छापताना सतत अडथळे आणतात, धमक्या देतात असा आरोप त्यांनी केला. त्याच सुमारासा मोहंमद तकी, फ्लॉरिडास्थित डाक्टर, यांचा स्तंभ लष्करानं बंद करायला लावला. तकी लष्कराच्या कारभाराबद्दल टीका करत असत. थोडक्यात असं की आता हा पेपर बंद होण्याच्या वाटेवर आहे. २०११ मधे लष्कराची फूस असलेल्या हस्तकानं ज्याना ठार मारलं ते सलमान तासीर या दैनिकाचे मालक होते. तासिर उद्योगपती होते….

Read More Read More

भारतीय पैसा परदेशात जातो परदेशातला पैसा भारतात यायला नाराज. कां?

भारतीय पैसा परदेशात जातो परदेशातला पैसा भारतात यायला नाराज. कां?

भारताची शेती व्यवस्था चांगली नसल्यानं भारतात पैसे गुतवतांना अमळ विचार करावा, काळजी घ्यावी असं मत  चार्ल्स स्लॅब या संस्थेनं नोंदवलं आहे. ही संस्था जगभरच्या गुंतवणुकदारांना सल्ला देत असते.  चार्ल्स स्लॅबचं निरीक्षण नवं नाही. गेली वीसेक वर्षं भारतातलं शेतीचं उत्पन्न घसरत चाललं आहे. भारतातले जमीन विषयक कायदे, शेतमालाच्या किमतींचं आणि व्यवहाराचं नियंत्रण करणारे कायदे, एकूणच शेतकरी विषयक कायदे शेतीला मारक ठरले आहेत. बहुसंख्य शेतकऱ्यांकडं एक हेक्टर जमीन. वीज व पाण्याची खात्री नाही. अशा स्थितीत एका हेक्टरातून निघणार काय?  ना शेतकऱ्याला फायदा…

Read More Read More

आयसिस उत्तरार्ध

आयसिस उत्तरार्ध

 १९२६ साली केमाल पाशानं ऑटोमन खिलाफत बरखास्त केली. त्यानं अधिकृतरित्या राज्य – स्टेट- शरियापासून आणि कुराणापासून मुक्त केलं. अल बगदादी आणि आयसिसला पुन्हा एकदा खिलाफत म्हणजे सर्वंकष धर्मराज्य प्रस्थापित करायचं आहे. आधुनिकता आणि आधुनिक समाज न समजलेल्या इस्लामी लोकांना खिलाफत या कल्पनेचं फार आकर्षण आहे.  इस्लामचं राज्य असलेल्या पाकिस्तान किवा सौदी अरेबियात इस्लामी माणसं सुखी नाहीत. इस्लामी राज्य नसलेले अमेरिका, युरोप, भारत इत्यादी देशात मुसलमान सुखानं जगत आहेत. असं असूनही  काही मुसलमानांना वाटतं की त्यांची काल्पनिक दुःखं   खिलाफत स्थापन…

Read More Read More

आयसिस १

आयसिस १

नारिंगी जंप सुट घातलेला एक मध्यम वयीन माणूस गुढग्यावर उभा. नारिंगी जंप सुट.  ग्वांटानामो बे या अमेरिकन छळछावणीतल्या माणसांना असे कपडे घालावे लागत. अफगाणिस्तान, आखाती देश  इत्यादी ठिकाणी पकडलेले जिहादी ग्वांटानामो बे छावणीत दाखल केले जात.  नारिंगी सूट घातलेला माणूस आहे जेम्स फॉली.  अमेरिकन पत्रकार. कित्येक महिने तो सीरिया-इराकमधील युद्ध-संघर्षाच्या बातम्या देत असे, फिल्म्स करत असे. त्याच्या मागं उभा आहे काळे कपडे घातलेला आयसिसचा जिहादी.  जेम्स फॉली भाषण करतो. अमेरिकन सरकारला विनंती करतो की त्यांनी इस्लामच्या विरोधात चालवलेलं युद्ध बंद…

Read More Read More

पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

पत्रकारी लेखनाला साहित्यिक लेखनाचं नोबेल पारितोषिक

२०१५ चं साहित्याचं नोबेल पारितोषिक स्वेतलाना अॅलेक्सिविच या पत्रकार महिलेला मिळालंय. त्यांची काही प्रसिद्ध, प्रभावी पुस्तकं अशी – व्हॉईसेस फ्रॉम चेर्नोबिल,  झिंकी बॉईज (अफगाण युद्धातल्या रशियनांची कथनं), वॉर्स अनवुमनली फेस (दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेल्या रशियन स्त्रियांच्या कहाण्या). अॅलेक्सिविच सध्या बेलारूसची राजधानी मिन्स्क या शहरात रहातात. नारोवल या गावातल्या स्थानिक पेपरात त्या काम करतात. त्यांनी लिहिलेली पुस्तकं सोवियेत युनियनच्या राज्यकर्त्यांना मान्य नसल्यानं त्यांना फ्रान्स, जर्मनीत परागंदा व्हावं लागलं होतं.  बेलारुस हा त्यांचा पूर्व युरोपियन देश सोवियेत युनियनमधून मुक्त झाल्यावर त्या आपल्या…

Read More Read More

शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

शहरातही व्यावसायिक शेती शक्य आहे

शहरातल्या मोकळ्या जागा, गच्च्या, बाल्कन्या इत्यादी ठिकाणी करता येणारी शेती म्हणजे शहर शेती. शेती म्हणजे वनस्पती वाढवण्याची सवय माणसाला कित्येक हजार वर्षांपासून आहे. खतं, जंतुनाशकं, संस्कारित बिया आणि सिंचन या गोष्टी हाताशी आल्यावर विसाव्या शतकात शेतीबद्दलच्या कल्पना बदलल्या. माहिती तंत्रज्ञानानं जगातल्या शेतीत गुंतलेल्या अगणित प्रक्रियांची माहिती प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं गोळा करणं आणि त्या माहितीची तितक्याच वेगानं घुसळण करून वनस्पतीचा वाढीला क्रांतीकारक दिशा दिली.   शेतीबद्दलची पारंपरीक कल्पना आणि व्यवहार आता एकदमच बाजूला पडला आहे. निसर्गानं वनस्पतीच्या उत्पादनावर टाकलेल्या मर्यादाही नव्या तंत्रज्ञानानं…

Read More Read More

शांतता नोबेलची वेगळी वाट

शांतता नोबेलची वेगळी वाट

२०१६ च्या नोबेल शांतता पारितोषिकाच्या रांगेत पोप, अँगेला मर्केल आणि इराणचा न्युक्लियर कार्यक्रम थांबवणारे मुत्सद्दी उभे होते. पोपनी जगभरचे गरीब आणि वादळात सापडलेल्या १.२ अब्ज कॅथलिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. मर्केल यांनी लाखो असहाय्य अरब निर्वासितांना आपल्या देशात वसवायचं आश्वासन दिलं. इराणला अणुबाँब पासून दूर नेलं अमेरिकन-इराणी मुत्सद्द्यांनी. या साऱ्यांना दूर सारून अगदीच अनपेक्षित ‘ट्युनीशियन राष्ट्रीय संवाद चौकडी’ ला देण्यात आलं. या चौकडीत जनरल ट्रेड युनियन, मानवी अधिकार संघटना, वकील संघटना आणि उद्योगी संघटनांची परिषद यांचा समावेश आहे. या…

Read More Read More

हिंदुप्रेम नव्हे मुस्लीमगंड हा हिंदुत्वावादाचा पाया

हिंदुप्रेम नव्हे मुस्लीमगंड हा हिंदुत्वावादाचा पाया

दादरी या उत्तर प्रदेशातल्या गावात अखलाख नावाच्या माणसाकडं गोमांस आहे अशी अफवा पसरली. अखलाखकडं गोमांस आहे असं म्हणत गावातला एक हिंदुत्ववादी तरूणांचा गट  पुजाऱ्याकडं पोचला. पुजाऱ्यांनं गावकऱ्यांना देवळात एकत्र येण्याचं आव्हान केलं. गावकरी गोळा झाले, अखलाखच्या घरी पोचले. अखलाखच्या फ्रीजमधे मांस होतं. अखलाख म्हणत होता फ्रीजमधे मटण होतं. गावकऱ्यांचं म्हणणं होतं की ते गोमांस होतं. गोमांस आणि मटण यातला फरक सिद्ध करण्याची वाट न पहाता गावकऱ्यांनी अखलाखला बडवायला सुरवात केली. त्याला ठार मारलं. दादरीची लोकसंख्या आहे ५८ हजार. गावातली ६६…

Read More Read More

ओम शिनरिक्यो या अधोरी पंथाची गोष्ट

ओम शिनरिक्यो या अधोरी पंथाची गोष्ट

ओम शिनरिक्यो नावाचा एक अघोरी पंथ जपानमधे आहे. हिंदू,बुद्ध इत्यादी विचारांचं एक अपूर्वअघटित मिश्रण या पंथानं तयार केलंय. सध्याचं युग वाईट आहे, त्यातली माणसं वाईट आहेत, त्यातल्या संस्था वाईट आहेत, त्या नष्ट केल्या पाहिजेत असं या पंथाचं मत आहे. सभोवतालच्या लोकांना मारून टाकायचं, त्यांचे खून करायचे असं या पंथाचं तत्व आहे. या पंथाच्या लोकांनी केलेल्या अघोरी कृत्यांबद्दल पंथाचा प्रमुख आणि सहा कार्यकर्ते फाशी गेले आहेत. तरीही पंथ शिल्लक असून जपानी सरकारचं त्यावर कडक लक्ष आहे, जपानी समाज त्यांना दूर ठेवतो,…

Read More Read More

व्यवहार्य अर्थवादी विचार राजकीय पक्षांनी स्वीकारण्याची आवश्यकता

व्यवहार्य अर्थवादी विचार राजकीय पक्षांनी स्वीकारण्याची आवश्यकता

शेतकरी, उद्योगी, कामगार, मध्यमवर्गीय, सैनिक, सरकारी नोकर, शेतमजूर, दलित, मुसलमान सर्वच वर्गातली माणसं न्याय मागत आहेत. प्रत्येक वर्गाची तक्रार आहे की त्यांची अवस्था वाईट आहे, सरकारनं त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे. सर्वच वर्गात अन्यायाची भावना आहे म्हणजे काही तरी चुकतंय. तमाम जनतेला सरकारनं त्यांच्यासाठी काही तरी केलं पाहिजे असं वाटतंय.सरकार म्हणजे राजकीय पक्षांनी चालवलेलं सरकार. राजकीय पक्ष निकामी आणि भ्रष्ट आहेत असंही लोक म्हणत असतात. सरकार अकार्यक्षम आणि भ्रष्ट आहे असंही लोक म्हणत असतात. मग अशा पक्ष आणि सरकारकडून लोकं…

Read More Read More