फोक्सवॅगनच्या प्रदूषण करणाऱ्या गाड्या
प्रदूषण करणाऱ्या फोक्स वॅगन गाड्या फोक्स वॅगन या नामांकित जर्मन कंपनीनं विकलेल्या ४.८२ लाख डिझेल कार अमेरिकेत नायट्रोजन ऑक्साईड हा विषारी घातक वायू हवेत सोडत होत्या. अमेरिकन सरकारच्या प्रदूषण नियंत्रण विभागाला ते आढळून आलं. सहनशक्ती मर्यादेच्या ४० पट जास्त घातक वायू या कार हवेत सोडत होत्या. या घातक वायूमुळं दर वर्षी ५८ हजार माणसं अमेरिकेत मरत होती. जगभर १.१ कोटी कार विकणाऱ्या या कंपनीच्या कार देशोदेशी जातांना कार प्रदुषण करत नाही याची प्राणपत्रं घेऊन जातात. मग अमेरिकेतल्या कार प्रदूषण कां…