Browsed by
Author: niludamle

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराची इस्माइली हत्याकांडाचा धडा, इस्लामचं काही तरी करा

कराचीमधे बसमधून चाललेल्या इस्माइली पंथाच्या लोकांवर सहा जणांनी गोळीबार केला. त्यात ४९ व्यक्ती मारल्या गेल्या, वीसपेक्षा जास्त जखमी झाल्या. मृतांत स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं होती. हल्ला नियोजित होता. इस्माइली माणसं अमूक ठिकाणाहून तमूक ठिकाणी बसमधून अमूक वेळी जाणार आहेत हे हल्लेखोरांना माहित होतं. हल्लेखोर तीन बाईक्सवरून आले आणि बसवर दोन बाजूंनी हल्ला केला. काही मिनिटं ही घटना घडली. हल्लेखोर पळून गेले.  सुरवातीला जुंदाल्ला या संघटनेनं या घटनेची जबाबदारी स्विकारली. जुंदाल्ला ही संघटना तहरिके तालिबान या पाकिस्तानी तालिबान या छत्री संघटनेचा…

Read More Read More

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

भारतात कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो.

कायदा या कल्पनेवर भारताचा विश्वास नाही. कायद्याला अनेक पर्याय भारतीय जनतेनं शोधले आहेत. कधी कधी अगदीच नाईलाज झाला तर कायदा पाळला जातो. सलमान खान खटल्याची सुरवात अशी झाली. २८ सप्टेंबर २००२ च्या  मध्यरात्रीनंतर वांद्र्याच्या फूटपाथवर सलमान खानची गाडी आदळली. एक माणूस मेला, चार जखमी झाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सलमानच्या रक्ताची तपासणी करून त्याला सोडून दिलं. २९ रोजी माध्यमांमधे ही घटना लोकांना पहायला मिळाली. ३० तारखेच्या पेपरात सविस्तर बातम्या आल्या. तरी सलमान बाहेर. जणू काही घडलंच नव्हतं.  त्या वेळी निखील वागळे…

Read More Read More

माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया

माणसाला थिजवून टाकणारा मल्टिपल स्क्लेरॉसिस, त्या रोगाशी झुंजणाऱ्या दोन स्त्रिया

नऊ  मे या दिवशी जगभर अनेक संघटना आणि माणसं  मल्टिपल स्क्लेरॉसिस नावाच्या रोगाशी झुंज देण्याचा निर्धार करत असतात.  मल्टिपल स्क्लेरॉसिस. माणसाच्या मज्जातंतूवरचं आवरण नष्ट होण्यानं निर्माण होणारी व्याधी. माणसाच्या शरिरातील मज्जातंतू शरीरभर संदेश वहन करत असतात. मेंदूपासून विविध स्नायूंपर्यंत. स्नायूंपासून मेंदूपर्यंत.  माणसाच्या डोळ्याला टेबलावरचा चहाचा कप दिसतो. त्याच्या नाकाला चहाचा वास येतो. नाक आणि डोळे त्यांची संवेदना मेंदूला कळवतात. माणसानं आधी कित्येक वेळा चहा प्यालेला असल्यानं चहाची चव आणि वास मेंदूनं साठवलेला असतो.  आवडीचा आणि परिचयाचा असल्यानं  हा चहा प्यायला…

Read More Read More

कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

कोर्ट ही फिल्म. दिग्दर्शकाची हौस. बस.

 एका लोकशाहिराचा सरकारनं केलेला छळ ही कोर्ट सिनेमाची गोष्ट आहे.  आंबेडकरवादी कार्यकर्ता गरीब-कामगारांचं प्रबोधन करत असतो. शाहिरीतून. सरकार त्याच्यावर खटला भरतं. एक गटारात काम करणारा कामगार मरण पावलेला असतो. ते मरण नैसर्गिक नसून ती लोकशाहिराच्या चिथावणीमुळं केलेली आत्महत्या होती असं सरकार ठरवतं. लोकशाहिरावर खटला भरतं. खिशात पैसे नसलेल्या लोकशाहिराचे सरकार आणि न्यायव्यवस्था कसे हाल करते याचं कथन या सिनेमात आहे. देशातली न्यायव्यवस्था आणि राज्यव्यवस्था येव्हांना समजलेली आहे. न्याय व्यवस्थेत न्याय मिळणं हा केवळ एक अपघात असतो, एक चान्स असतो हेही…

Read More Read More

काश्मिरबाबत मोदी सरकारकडं धोरण नाहीये? भाजप काश्मिर सरकारात केवळ सत्ता मिळवण्यासाठी सहभागी झालाय?

काश्मिरबाबत मोदी सरकारकडं धोरण नाहीये? भाजप काश्मिर सरकारात केवळ सत्ता मिळवण्यासाठी सहभागी झालाय?

एनडीटीव्हीवर झालेल्या कार्यक्रमात एक काश्मिरी मुस्लीम तरूण बोलला. तो स्वतःला भारतीय मानत नव्हता. काश्मिर भारताचा भाग नाही, असू नये असं त्याचं मत होतं. भारतानं काश्मिरी लोकांवर कायम अन्यायच केला आहे, त्यांना दुराव्यानं वागवलं आहे असं त्याचं म्हणणं होतं. काश्मिरात झालेल्या उद्रेकाच्या पाठपडद्यावर हा कार्यक्रम झाला होता. पहिल्या प्रथमच काश्मिरी लोकांनी पाकिस्तानी झेंडे जाहीरपणे फडकावले होते. मसरत आलम नावाच्या एका फुटीर-पाकिस्तान धार्जिण्या माणसाला काश्मिर कोर्टानं तुरुगांतून सोडण्याच्या घटनेनं काश्मिरातल्या असंतोषाला सुरवात झाली. काश्मिर आणि भारत सरकारचं म्हणणं असं की मसरतला कोर्टानं…

Read More Read More

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

सर्जकता, साक्षेपी विचार, कलाकृती.

महत्त्वाची सर्जक कलाकृती समजायला जर तशीच सर्जकता लागत असेल तर हवीय कशाला तशी कलाकॄती ? सर्जकता, सर्जक कलाकृती, ती समजून घेण्यासाठी सर्जकता. कलाकृती सर्जक असू शकते किंवा सर्जक नसलेली भरड कलाकृती असू शकते.  सामान्य कोणीही माणूस चार ओळी लिहून तिला कविता म्हणू शकतो, त्याच्या दृष्टीनं ती कविताही असते. दोन पाच हजार शब्द लिहून एखादा त्या मजकुराला कथा म्हणू शकतो. साठ सत्तर हजार शब्द गोळा झाले तर  कादंबरी म्हणता येते.  कॅमेरा आणि एडिटिंग सॉफ्टवेअर वापरून क्लिप तयार करणं कोणालाही जमू शकतं,…

Read More Read More

लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

लोकशाही आणि एकव्यक्ती राजवट. ली क्वान यू.

२३ मार्च रोजी ली क्वान यू यांचं ९१ व्या वर्षी  निधन झालं. ली क्वान यू १९६५ साली सिंगापूरचे प्रधान मंत्री झाले. त्या वर्षी सिंगापूर मलेशियापासून वेगळा झाला. १९९९ साली ते प्रधान मंत्री पदावरून दूर झाले पण मंत्रिमंडळाचे एक सदस्य म्हणून राहिले. २००४ साली ते मार्गदर्शक मंत्री म्हणून मंत्रिमंडळावर लक्ष ठेवून होते.  २०१४ पर्यंत म्हणजे सुमारे पन्नास वर्षं त्यांची सिंगापूरच्या सत्तेवर, राजकारणावर पकड होती. वयोमानानुसार ते मुख्य पदावरून निवृत्त झाले तरी या ना त्या स्वरूपात सिंगापूरची सत्ता त्यांच्याच हाती होती, त्यांच्या…

Read More Read More

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनमधली इस्लामी मारामारी

येमेनच्या राजधानीवर सौदी अरेबियाची विमानं बाँब हल्ले करत आहेत. त्यांना इजिप्त, कतार, अरब अमिराती या देशांचा पाठिंबा आहे. पाकिस्तानचाही पाठिंबा आहे परंतु पाकिस्ताननं तिथं सैनिक पाठवायचं अजूनपर्यंत टाळलं आहे. सौदी अरेबिया सानामधे घुसलेल्या हुती सरकारला हुसकावण्याच्या प्रयत्नात आहे. गेले काही दिवस उत्तर येमेनमधे बलवान असलेल्या हुती या संघटनेनं येमेनच्या राजधानीचा ताबा घेतला असून साऱ्या येमेनवरच सत्ता मिळवण्याचा हुती या संघटनेचा इरादा आहे.  हुती या संघटनेकडंही भरपूर शस्त्रं आहेत. त्यामुळं लढाई तुंबळ आहे. येमेनी जनतेचं मत  विभागलेलं आहे. हुतीला पाठिंबा असलेले…

Read More Read More

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एकादशी- जागतीक दर्जाचा सिनेमा

एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पंढरपूर या गावातल्या एका कुटुंबाच्या जगण्यातले काही दिवस या चित्रपटात आहेत. मध्यम वर्गीय कुटुंब. कुटुंबातला कर्ता माणूस वारला आहे. त्याची पत्नी, आई आणि त्याची दोन मुलं. मुलांची आई स्वेटर विणून, स्वयंपाकाची कामं करून घर चालवते, मुलांना वाढवते. मुलाच्या दिवंगत वडिलानी हौसेनं डिझाईन केलेली एक सायकल आहे. मुलगा ती जिवापाड जपतो. मोठा झाल्यावर, उंची वाढल्यावर, त्याला ती वापरायची आहे.  लोकांकडून कामाचे पैसे न आल्यानं आईचं स्वेटर विणायचं गहाण यंत्रं   बँक जप्त करायला…

Read More Read More

व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?

व्यंकटरमण सुब्रमण्यमना नोबेल कां मिळतं, ते रॉयल सोसायटीचे अध्यक्ष कां होतात?

व्यंकटरमण सुब्रमण्यम ब्रीटनमधल्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष झाले आहेत. त्या आधी२००९ मधे त्यांना मॉलिक्युलर बायॉलॉजी विषयातलं नोबेल पारितोषिक (इतर दोन वैज्ञानिकांसह) मिळालं होतं. या दोन्ही घटना व्यंकटरमण यांचं जगातलं स्थान दाखवतं. वरील दोन्ही गोष्टी त्यांनी अमेरिका आणि ब्रीटनमधे साधल्या.ते वडोदऱ्यात जन्मले, तिथंच त्यांचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यांना आयआयटीत प्रवेश हवा होता. मिळाला नाही. त्यांना संशोधन करायचं होतं, त्यांचे आई वडील दोघंही संशोधक होते. व्यंकटरमण अमेरिकेत पोचले. तिथं त्यांनी ओहायो विश्वशाळेत डॉक्टरेट केली. नंतर येल विश्वशाळा, ब्रुकलीन इन्सटीट्यूट या ठिकाणी त्यांनी  मॉलिक्युलर…

Read More Read More