Browsed by
Author: niludamle

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या. गेलं वर्षंच नव्हे तर दशक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी चिंतित आहे. हज्जारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे काही सुखासुखी घडत नाहीये. शेती करणं, त्यासाठी घेतलेली कर्जं न फिटणं,  फायदा न निघणं यातूनच आत्महत्या होताहेत. शेती तोट्यात आहे या एका वाक्यात आत्महत्येचं कारण सांगता येईल. सरकार खतांवर सबसिडी देतेय. वीज आणि पाणी कमी किमतीत देतंय. शेतीतली काही उत्पादनं हमी भाव देऊन खरेदी करतंय. येवढं सारं करूनही शेतकऱ्याला त्याचा खर्च भागवून चार पैसे उरतील अशा रीतीनं शेती करता येत नाहीये….

Read More Read More

धर्माचा दरवाजा

धर्माचा दरवाजा

इराकमधे आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली,त्यातल्या माणसांना ” आपल्या ” इस्लामचे बंदे व्हा असा आदेश दिलाय. जे हा आदेश पाळणार नाहीत त्यांचा छळ होतो, त्याना ठार मारलं जातं.  आयसिसचा इस्लाम हा जगातल्या इतर रूढ इस्लामांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो नेमका कसा आहे आणि वेगळा कां आहे हे नीट समजलेलं नाही. सामान्यतः अल बगदादी हा त्यांचा पुढारी जे म्हणेल ते मान्य करणं असा त्या इस्लामचा अर्थ आहे.  इराकमधले मुस्लीम असोत की ख्रिस्ती की आणखी कोणी. त्या सर्वांना…

Read More Read More

पेशावरची शाळा

पेशावरची शाळा

पेशावरच्या शाळेत सात जिहादींनी 132 मुलं मारली. दोन चोरलेल्या गाड्यांतून जिहादी शाळेत पोचले. पंधरवडाभर आधी पाक-अफगाण सरहद्दीवर त्यांचं प्रशिक्षण झालं होतं, हल्ल्याचं नियोजन झालं होतं. एका अभ्यासवर्गासाठी हॉलमधे जमलेल्या विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार झाला. पळणाऱ्याना पाठून गोळ्या घातल्या. घाबरून थिजून बसलेल्या मुलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलं मेली आहेत की नाहीत ते तपासून त्यात जिवंत आढळलेल्यावर गोळ्या झाडल्या.  रक्ताची थारोळी आणि प्रेतांचा खच एकदा पाहून झाल्यावर जिहादीनं आपल्या नेत्याला फोनवरून विचारलं ” मुलं मारून झालीत, आता काय करू.” पलिकडून उत्तर…

Read More Read More

ताराबाई मेढेकर

ताराबाई मेढेकर

औरंगाबादच्या ताराबाई मेढेकर गेल्या. मेढेकर गाडीचं एक चाक, अप्पा मेढेकर, काही दिवसांपाठीच निखळलं. ताराबाईंच्या निधनानं दुसरंही निखळलं. जगात कोणाचंही काहीही बाकी न ठेवता ताराबाई गेल्या. सारं बेबाक करून गेल्या. ताराबाईंचा संसार मोठा होता. दीर, नणंदा, मुलं सर्वांचे संसार उभे करण्यासाठी त्या कंबर कसून उभ्या होत्या. लग्नं, डोहाळे जेवणं, बारशी, शिक्षण, सणसोहळे, आजार पाजार, संकटं. प्रत्येक गोष्टीत त्या न बोलता, आनंदानं उभ्या असत. ही झाली त्यांच्या नात्यातली, सख्खी माणसं. अप्पासाहेबांमुळं, हैदराबाद स्वातंत्र्य  चळवळीमुळं तयार झालेली नाती वेगळीच. किती तरी माणसं. त्यांच्या…

Read More Read More

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स मानवी समाजाचा नाश घडवून आणेल असं पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणाले आहेत.  कॉन्वर्सेशन नावाच्या एका नियतकालिकात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. माणसानं यंत्राला बुद्दीमत्ता दिल्याचा हा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे.  यंत्रं म्हणजे काय होतं? एकमेकांत गुंतवलेली दातेरी चक्रं. आसाभोवती फिरणारी चाकं. पुढं मागं किंवा गोलाकार फिरणारे दट्ट्ये. हातानं नाही तर विजेवर चालवलेली यंत्रं. एकादं यंत्रं सूत कातत असे.एकादं यंत्रं कापड विणत.एकादं यंत्रं चाक फिरवत असे. एकादं यंत्रं भोकं पाडत असे. एकादं यंत्रं वस्तू जुळवत असे किंवा…

Read More Read More

आता गीता

आता गीता

गीता हे एक राष्ट्रीय पुस्तक आहे असं सांगण्याची आवश्यकता होती काय? देशासमोर आर्थिक प्रश्न आहेत. दुष्काळ होताहेत. दिल्लीत बलात्कार होताहेत. खूप महत्वाचे प्रश्न लोंबकळत असताना या लोकांना हे असले उद्योग कसे करावेसे वाटतात. एक गीता प्रेस नावाचा छापखाना आहे. दर वर्षी तो गीतेच्या हज्जारो प्रती छापतो. गीता प्रेसला दुसरं काहीही छापायला वेळ सापडत नाही इतक्या गीतेच्या प्रती छापल्या जातात. गीतेच्या लाखो प्रती खपत असतात.  महाराष्ट्रात गीताईच्या हज्जारो प्रती खपत असतात. ज्ञानेश्वरी ही मराठीतली गीता आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांना उमगलेली गीता लोकांसमोर,…

Read More Read More

स्थानिक पक्षांशी युती

स्थानिक पक्षांशी युती

भाजप आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे. मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हां कुरबूर करत दोन्ही पक्ष एकत्र होते. नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागावाटपात मतैक्य न झाल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. मोदी यांनी प्रचाराचा झंझावात केल्यानंतर, मोदींना विरोध करत करत सेनेनं ६३ माणसं निवडून आणली. विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं नाही.  राष्ट्रवादीचा बेभरवशाचा पाठिंबा भाजपनं घेतला. मंत्रीपदांवरून भाजप-सेनेत संघर्ष झाला. विधानसभेत अल्पसंख्य रहाण्याचा अर्थ सरकार कधीही कोसळू शकलं असतं. म्हणजे पुन्हा निवडणुका आणि पुन्हा जुनीच कोंडी.  सेनेची अस्मिता-अस्तित्व आणि…

Read More Read More

मद्य मधे मधे

मद्य मधे मधे

व्हिस्की व्हिस्की बायबल नावाच्या एका नियतकालिकानं स्कॉटलंडमधे तयार होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीला दर्जेदार व्हिस्कीच्या क्रमवारीत खाली ढकललं आहे. व्हिस्की बायबल नावाचं एक गाईड निघतं. बायबल या धर्मग्रंथाच्या नावाचा वापर ब्रँडसाठी करणं, आपल्या गाईडच्या प्रचार-प्रसारासाठी  करणं हा प्रकार पश्चिमेतलेच लोक करू जाणोत. भारतात असं काही करून पहावं आणि त्याची काय प्रतिक्रिया येईल याची कल्पना करावी. असो. तर २००३ पासून हे गाईड प्रसिद्ध होतं. जगभरच्या व्हिस्क्यांचा अभ्यास या गाईडमधले जाणकार करतात. नंतर त्यांच्या ज्या काही कसोट्या असतात त्यानुसार ते व्हिस्कीला क्रमांक देतात. पहिला …

Read More Read More

अस्पृश्यता अजूनही शिल्लक

अस्पृश्यता अजूनही शिल्लक

भारतात २७ टक्के माणसं अस्पृश्यता पाळतात असं एका देशी-परदेशी अभ्यास संस्थेनं (IHDS) शोधलं आहे.  जैन, हिंदू, मुस्लीम, शिख,ख्रिस्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, ब्राह्मण, इत्यादी वर्गातल्या ४७ हजार लोकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीत पहिला प्रश्न विचारला होता ‘ तुम्ही अस्पृश्यता पाळता?’ त्याला ७५ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. नंतरचा  प्रश्न होता ‘ तुम्ही अनुसुचित जाती, शेड्यूल्ड कास्टच्या लोकांना स्वयंपाकघरात प्रवेश द्याल ? आपली भांडी त्याना वापरायला द्याल? ‘  त्यावर सत्तावीस टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. ब्राह्मण ( ५२…

Read More Read More

एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.

एलिझाबेथ एकादशी. एक जगात टिकेल असा सिनेमा.

एलिझाबेथ एकादशी. एलिझाबेथ खरंच टिकाऊ आहे. खूप टिकेल. खूप लक्षात राहील. कित्येक वर्षात इतका सुंदर मराठी चित्रपट पहायला मिळाला नव्हता. पंढरपुरातली चार पाच छोटी मुलं. प्रत्येकाचं घर वेगळं, घरची माणसं वेगळी. प्रत्येकाच्या घरच्या समस्या वेगळ्या. मुलं आपलं लहानपण पुरेपूर जगत असताना आपल्या घरचा भार उचलण्याच्या खटपटीत. खट्याळ, वांड, अभ्यास करणारी आणि अभ्यास न आवडणारी मुलं. आपलं लहानपण जगत असतानाही मोठ्या माणसासारखी वागायचा प्रयत्न करणारी. मोठी माणसं जशी नसतात पण असायला हवीत तसं वागणारी.  चित्रपट पंढरपूरच्या गर्दीत घेतला आहे. तिथली घरं,…

Read More Read More